शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा
2
मतदार यादीतून वगळलेले ६५ लाख कोण? तीन दिवसांत सादर करा; सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला आदेश
3
१ पद, २ विभाग अन् २ आदेश; CM देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या खात्यांमध्ये नियुक्तीवरून संघर्ष?
4
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये उद्ध्वस्त झालेले मुख्यालय पुन्हा बांधण्यासाठी जैशचा प्रमुख पुन्हा सक्रिय; मसूद अझहरने अनेकांकडे देणग्या मागितल्या
5
नवजात लेकीला कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकलं पण 'त्याने' जीवदान दिलं, शरीराला लागलेले किडे
6
RBI च्या निर्णयानंतर गुंतवणूकदारांना झटका! विप्रोसह 'या' क्षेत्रात मोठी घसरण, कुठे झाली वाढ?
7
“जनभावनेचा आदर करणारे हे सरकार, आम्ही...”; ‘महादेवी’ परतण्याबाबत एकनाथ शिंदेचे मोठे विधान
8
लग्नाचं निमंत्रण दिलं नाही, सहकाऱ्यांनी एचआरकडे केली तरुणीची तक्रार, त्यानंतर घडलं असं काही...
9
"कित्येकांनी बलिदान दिले, शिरांचे ढीग लागले, पण धर्म सोडला नाही"- मोहन भागवत
10
एकनाथ शिंदेंची दिल्लीवारी; अमित शाहांशी बैठकीत काय चर्चा झाली? खुद्द उपमुख्यमंत्री म्हणाले...
11
"डोकं फिरवू नका, मी मंत्री, तुम्ही मलाच न सांगता...", PWD अधिकाऱ्यावर संतापले दयाशंकर सिंह
12
जगाला आपल्या धाकात ठेऊ पाहणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची संपत्ती किती? उत्पन्नाचा खरा स्रोत कोणता?
13
एकावर एक बोनस शेअर देणार 'ही' कंपनी; सोबत डिविडंडही मिळणार; गुंतवणुकदारांना दुप्पट फायदा
14
आधार ओटीपी वापरून ITRचं ई-व्हेरिफिकेशन करा, अन्यथा रिटर्न अवैध ठरेल; पाहा संपूर्ण प्रोसेस
15
८८२ कोटींचा खर्च, २०२८ मध्ये होणार पूर्ण; ८ ऑगस्टला सीतामातेच्या जानकी मंदिराचे भूमिपूजन
16
'कायद्याच्या कचाट्यात महादेवी हत्तीला अडकवू नका, ... तोपर्यंत लढा सुरूच राहणार'; राजू शेट्टींनी स्पष्टच सांगितलं
17
वॉशिंग मशिन वापरताना ‘ही’ किरकोळ चूक जीवावर बेतली; तरुणाचा मृत्यू; करायला गेला एक आणि..
18
बुकिंग करणाऱ्या ग्राहकांवरच शाओमी उलटली; आता म्हणतेय आठवड्यात पूर्ण पैसे द्या नाहीतर...
19
Wasim Jaffer: वसीम जाफरवर मोठी जबाबदारी, आता विदर्भातील खेळाडूंना शिकवतील फलंदाजीचे धडे!
20
ICC Test Ranking : मियाँ 'मॅजिक'नंतर 'मार मुसंडी' शो! सिराजला ICC कडून मिळालं मोठं गिफ्ट

'Mission 160' : आगामी लोकसभेसाठी भाजपचा प्लॅन तयार, 'या' राज्यांकडे असणार विशेष लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2023 20:30 IST

Loksabha Election 2024: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशातील बहुतांश राजकीय पक्ष सक्रिय दिसत आहेत. 

नवी दिल्ली : नागालँड, मेघालय आणि त्रिपुरा या तीन ईशान्येकडील राज्यांच्या विधानसभा निवडणुका नुकत्याच पार पडल्या आहेत. या निवडणुकांमध्ये विजय मिळत भाजप आणि त्यांचा मित्रपक्ष पुन्हा एकदा एकत्र सत्तेत आला आहे. दरम्यान, ईशान्येकडील निवडणुका संपल्यानंतर भाजपने 2024 च्या लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशातील बहुतांश राजकीय पक्ष सक्रिय दिसत आहेत. 

भाजपचे ज्येष्ठ नेते आत्तापासूनच मोठ-मोठ्या व्यासपीठावरून आगामी लोकसभा निवडणुकीकडे इशारा करताना दिसून येत आहेत. यातच आता सत्ताधारी भाजपने 2024 च्या निवडणुकीची ब्ल्यू प्रिंट तयार केल्याची माहिती समोर येत आहे. त्यानुसार, सध्याची तयारी पाहता 2024 च्या निवडणुकीत सत्ताधारी पक्ष भाजप पूर्ण ताकदीने लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे दिसते. 

भाजपचे सर्वात मोठे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः 2024 च्या निवडणुकीसाठी 100 रॅली घेणार आहेत आणि डिसेंबर 2023 पर्यंत या रॅली पूर्ण करण्याची वेळ निश्चित करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या रॅलींद्वारे ओडिशा, पश्चिम बंगाल आणि दक्षिण भारतातील विशेषत: 160 मतदारसंघांमध्ये भाजपचे वर्चस्व निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. याशिवाय, अनेक मोठे प्रकल्पही जाहीर केले जाणार आहेत. तसेच, या रॅलींद्वारे महिला आणि अल्पसंख्याकांपर्यंत पोहोचण्यावर भाजपचा भर असणार आहे.

या राज्यांवर विशेष लक्ष असेल आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपने विजय मिळवला तर या निवडणुकीत विजयाची हॅट्ट्रिक करेल, म्हणजेच भाजप तिसऱ्यांदा केंद्रात आपले सरकार स्थापन करेल. सध्या भाजप दक्षिणेकडील राज्यांना मदत करण्याचा प्रयत्न करत आहे. जेणेकरून 2024 च्या लोकसभा निवडणुकीत त्याचा फायदा घेता येईल. सुत्रांच्या म्हणण्यानुसार, भाजप 2024 च्या निवडणुकीसाठी तामिळनाडू आणि केरळवर अधिक लक्ष केंद्रित करणार आहे. तसेच, भाजपची महिला मोर्चा शाखा देशातील महिलांपर्यंत पोहोचणार आहे.

टॅग्स :BJPभाजपाlok sabhaलोकसभाNarendra Modiनरेंद्र मोदी