शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

बिहारमध्ये काँग्रेसला सुरुंग लावण्याची भाजपाची तयारी, १३ आमदार संपर्कात असल्याचा केला दावा  

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2022 15:57 IST

Bihar Politics: बिहारमधील काँग्रेसचे अनेक आमदार भाजपाच्या संपर्कात आहेत. १९ पैकी १३ पेक्षा अधिक आमदार भाजपामध्ये येतील, असा दावा बिहारमधील भाजपा आमदार आणि फायर ब्रँड नेते हरिभूषण ठाकूर बचौल यांनी केला आहे.

पाटणा - बिहारमध्ये मुकेश सहानी यांचा पक्ष फोडल्यानंतर आता पक्षाची नजर काँग्रेसवर आहे. बिहारमधील काँग्रेसचे अनेक आमदार भाजपाच्या संपर्कात आहेत. १९ पैकी १३ पेक्षा अधिक आमदार भाजपामध्ये येतील. लवकरच बिहार काँग्रेसमध्ये पळापळ होणार असून, बिहारमध्ये भाजपाच्या आमदारांची संख्या ९०च्या पुढे जाईल, असा दावा बिहारमधील भाजपा आमदार आणि फायर ब्रँड नेते हरिभूषण ठाकूर बचौल यांनी केला आहे.

दरम्यान, भाजपा नेते हरिभूषण ठाकूर बचौल यांचा दावा बिहार विधानसभेतील काँग्रेसच्या सदस्यांचे नेते अजित शर्मा यांनी खोडून काढला आहे. बिहार काँग्रेसमधील सर्व आमदार एकजूट आहेत. कुठलाही आमदार फुटणार नाही, भाजपा नेते चर्चेत राहण्यासाठी अशी विधाने करत असतात. दरम्यान, व्हीआयपीचे तीन आमदार भाजपात दाखल झाल्याने विधानसभेमध्ये भाजपा ७७ आमदारांसह सर्वात मोठा पक्ष बनला आहे. आता काँग्रेसच्या आमदारांना तोडण्याचा भाजपा प्रयत्न करेल, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

अशा परिस्थितीत बचौल यांनी हे विधान करून त्या शक्यतांना बळ दिले आहे. भाजपा बिहारमध्ये आपल्या आमदारांची संख्या का वाढवत आहे? जातीय जनगणना, बिहारला विशेष राज्याचा दर्जा, मद्यविक्रीवरील बंदी, मुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्षांमधील वाद, यामुळे भाजपा आणि जदयू यांच्यातील वाद शिगेला पोहोचला आहे. त्यातच व्हीआयपीचे प्रमुख मुकेश सहानी यांच्या आमदारांना भाजपाने फोडल्यानंतर जेडीयूने सहानींचे समर्थन केले. त्यामुळेही भाजपा नाराज आहे. आमदारांची संख्या वाढवून भाजपा काही वेगळा खेळ खेळणार आहे का, की त्यामाध्यमातून नितीश कुमार यांच्यावर दबाव वाढवण्याचा प्रयत्न करत आहे का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

दरम्यान, २०१७ च्या तुलनेत उत्तर प्रदेशमध्ये भाजपाच्या ६० जागा घटल्या आहेत. आता राष्ट्रपती निवडणूक जवळ येत आहे. त्यात प्रत्येक आमदाराच्या मताचं मूल्य महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्यामुळेही भाजपा अधिकाधिक आमदारांना आपल्याकडे ओढून आपलं संख्याबळ वाढवण्याचा प्रयत्न करत असल्याचा अंदाज आहे.  

टॅग्स :BiharबिहारBJPभाजपाcongressकाँग्रेसPoliticsराजकारण