शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

नाराज शेतकऱ्यांशी संवाद साधणार भाजप, पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये शेतकरी संपर्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2021 07:31 IST

BJP : भाजप नेते शेतकऱ्यांशी संवाद साधतील आणि त्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारपर्यंत पोहोचवल्या जातील.

- नितीन अग्रवाल नवी दिल्ली : कृषी कायद्यांच्याविरोधात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाची किमत भाजपला उत्तर प्रदेशमधील आगामी विधानसभा निवडणुकीत मोजावी लागू शकते. हे टाळण्यासाठी पक्षाने या आंदोलनाचा राजकीय प्रभाव समजून घेण्याचे काम त्याने सुरू केले आहे. तिन्ही कृषी कायदे, उसाची थकबाकी आणि शेतमालाला किमान हमी भाव याबद्दल पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये शेतकऱ्यांत बरीच नाराजी आहे. याचा प्रभाव पश्चिम उत्तर प्रदेशच्या १०४ पैकी ५३ जागांवर पडू शकतो. या जागा शेतकऱ्यांचे प्राबल्य असलेल्या आहेत.

नुकत्याच झालेल्या जिल्हा पंचायत सदस्याच्या निवडणुकीच्या निकालांनी ही बाब भाजपला दिसली. म्हणून भाजपने पश्चिम उत्तर प्रदेशच्या विधानसभा जागांवर शेतकऱ्यासोबत खाट आणि ओट्यांवर बैठक घेण्याची योजना बनवली आहे. पक्ष सूत्रांनुसार मोठ्या चौपालच्या जागेवर लहान-लहान चौपाल लावले जातील.

शेतक-यांसोबत ही संवाद यात्रा मेरठ जिल्ह्यातील सिवालखास विधानसभा जागेवर सुरू होईल आणि नंतर पश्चिम उत्तर प्रदेशच्या सगळ्या विधानसभा जागांवर होईल. यात भाजप नेते शेतकऱ्यांशी संवाद साधतील आणि त्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारपर्यंत पोहोचवल्या जातील.

टॅग्स :BJPभाजपाFarmerशेतकरी