शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
5
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
6
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
7
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
8
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
9
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
10
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
11
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
12
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
13
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
14
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
15
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
16
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
17
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
18
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
19
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
20
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश

मोठी बातमी: महाराष्ट्रातील नेतृत्वाबाबत भाजपचा अखेर फायनल निर्णय; विधानसभेची रणनीतीही ठरली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2024 06:37 IST

भाजप पक्षश्रेष्ठींनी घेतला निर्णय; लाेकसभेच्या पराभवाचीही चर्चा.

संजय शर्मा, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वात कोणताही बदल करण्यात येणार नाही, असे त्या पक्षाने मंगळवारी स्पष्ट केले. लोकसभा निवडणुकांत महाराष्ट्रात भाजपला जे अपयश आले, त्यानंतर भाजपच्या नेतृत्वात बदल होईल अशी चर्चा होती. पण त्याला पक्षाच्या निर्णयाने पूर्णविराम मिळाला आहे.

महाराष्ट्र भाजपच्या महत्त्वाच्या नेत्यांशी भाजपचे अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्लीतील भाजप मुख्यालयात चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव, पीयूष गोयल, अश्विनी वैष्णव, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,  भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, त्या पक्षाचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे, विनोद तावडे आदी मान्यवर उपस्थित होते. महाराष्ट्राच्या भाजप नेतृत्वात कोणताही बदल करण्यात येणार नाही, असे केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी पत्रकारांना मंगळवारी सांगितले. 

यंदा लोकसभा निवडणुकांत भाजपने महाराष्ट्रात नऊ जागा जिंकल्या. २०१९ च्या लोकसभा निवडणुकांत भाजपने राज्यात २२ जागा जिंकल्या होत्या.

विधानसभेसाठी भाजपची रणनीती

- भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी रोड मॅप दिला आहे. लोकसभा निवडणूक हरण्याच्या कारणांवरही यावेळी चर्चा झाली. विधानसभा निवडणुकीत जातीय राजकारणाचा फटका टाळण्यासाठी व मराठा समाजाची नाराजी दूर करण्यासाठी भाजप मोठे निर्णय घेणार आहे.

- बैठकीनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, लोकसभा निवडणुकीच्या निकालांवर परिणाम करणारे घटक आणि आगामी विधानसभा निवडणुकीत त्या उणिवा कशा दूर करता येतील, अशा सर्व मुद्द्यांवरही चर्चा झाली.

- फडणवीस म्हणाले की, आता भाजप महायुतीत समाविष्ट असलेल्या आपल्या मित्रपक्षांशीही चर्चा करणार आहे. 

- सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मराठा, मुस्लीम आणि मागासवर्गीय भाजपच्या विरोधात एकत्र येऊन मतदान करत असल्याचा मुद्दा चर्चिला गेला. 

ओम बिरला यांचे नाव आघाडीवर१८व्या लोकसभेच्या अध्यक्षपदासाठी ओम बिरला यांचे नाव पुन्हा आघाडीवर आहे. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या निवासस्थानी एनडीएच्या नेत्यांची बैठक मंगळवारी पार पडली. यात मित्रपक्षांनी एकमताने अध्यक्षपदाचा निर्णय पंतप्रधान मोदींवर सोडण्याचा निर्णय घेतला.  

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAmit Shahअमित शाहBJPभाजपाmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४