शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
2
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
3
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
4
"आदमी खिलौना है" शेवटचं स्टेटस; अहमदाबाद विमान दुर्घटनेत हरियाणातील अंजू शर्मा यांचा दुर्दैवी अंत!
5
जन्मदाताच बनला हैवान! पत्नीशी झालेल्या भांडणाच्या रागात लेकरांवर केला वार, मुलीचा जागीच मृत्यू 
6
ज्याची होती चर्चा, तेच कारण समोर आलं...! राजाला का मारलं? सोनमनं सगळंच सांगून टाकलं; खरा मास्टरमाइंड आला समोर
7
मृतांचे क्लेम सेटलमेंट लवकर पूर्ण करणार; अहमदाबाद विमान अपघाताबाबत LIC चा मोठा निर्णय
8
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
9
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
10
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
11
कामाची बातमी! जितके किमी प्रवास, आता तितकाच भरा Toll; कसं काम करणार नवीन टोल पॉलिसी?
12
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
13
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
14
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट', काय आहे याचा अर्थ?
15
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
16
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
17
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
18
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
19
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
20
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!

भारतातील लोकसभा निवडणूक पाहण्यासाठी भाजपने जगभरातील 25 पक्षांना पाठवले निमंत्रण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2024 16:57 IST

अमेरिकेसह 'या' देशातील पक्षांना निमंत्रण नाही.

Lok Sabha Election: यंदाची लोकसभा निवडणूक खुप खास असणार आहे. एकीकडे सत्ताधारी भाजपने 400 पारचे ध्ये ठेवले आहे, तर दुसरीकडे पीएम मोदींचा पराभव करण्यासाठी सर्वच विरोधी पक्ष एकवटले आहेत. जगातील सर्वात मोठा लोकशाही देश असलेल्या भारताच्या निवडणुकीकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागून आहे. अशातच, सत्ताधारी भाजपने विविध देशातील 25 हून अधिक राजकीय पक्षांना भारतातील लोकसभा निवडणूक प्रचार पाहण्यासाठी आमंत्रित केले आहे. 

दरम्यान, भारतीय जनता पक्षाने 25 हून अधिक जागतिक पक्षांना लोकसभा निवडणूक प्रचार पाहण्यासाठी आमंत्रित केले आहे. या पक्षातील अनेक नेते भारतात येण्याची अपेक्षा आहे. विशेष म्हणजे, भाजपने अमेरिकेतील सत्ताधारी डेमोक्रॅट आणि विरोधी रिपब्लिकन, या दोन पक्षांना निमंत्रित केलेले नाही. अमेरिकन पक्षांना आमंत्रण न दिल्याबद्दल भाजपच्या एका नेत्याने वृत्तपत्राशी बोलताना सांगितले की, अमेरिकन पक्ष त्यांच्या अध्यक्षीय निवडणुकीत व्यस्त आहेत. याशिवाय अमेरिकन पक्षांची रचना ही भारतातील किंवा युरोपीय देशांतील पक्षांसारखी नाही.

ब्रिटन आणि जर्मनीच्या पक्षांना आमंत्रणभाजपने ब्रिटनच्या कंझर्व्हेटिव्ह आणि लेबर पक्षांना आमंत्रित केले आहे. याशिवाय, जर्मनीच्या ख्रिश्चन डेमोक्रॅट्स आणि सोशल डेमोक्रॅट्स पक्षालाही निमंत्रित करण्यात आले आहे. शेजारील देश पाकिस्तानसोबतचे खराब संबंध पाहता, तिथल्या कोणत्याही राजकीय पक्षाला निमंत्रण दिलेले नाही. याशिवाय कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना (CPC) लाही आमंत्रित करण्यात आलेले नाही. पण, बांगलादेशातून शेख हसीना यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी अवामी लीगला पाचारण करण्यात आले आहे.

भारताचा अजून एक शेजारी नेपाळबद्दल बोलायचे झाले तर, भारतीय जनता पक्षाने माओवादी पक्षासह नेपाळमधील सर्व प्रमुख राजकीय पक्षांना बोलावले आहे. याशिवाय श्रीलंकेतील सर्व प्रमुख पक्षांनाही पाचारण करण्यात आले आहे.

पंतप्रधान मोदींच्या रॅलीला उपस्थित राहणार रिपोर्टनुसार, मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात होणाऱ्या निवडणुकीच्या तिसऱ्या किंवा चौथ्या टप्प्यात जगातील विविध देशांतील राजकीय पक्षांचे नेते भारतात येणार आहेत. परदेशातून येणाऱ्या निरीक्षकांना प्रथम भाजप आणि भारताची निवडणूक प्रक्रिया आणि दिल्लीतील राजकीय व्यवस्थेची माहिती दिली जाईल. यानंतर पक्षाचे नेते आणि भाजप उमेदवारांची भेट घेण्यासाठी 5 ते 6 निरीक्षकांचा गट 4-5 लोकसभा मतदारसंघात नेण्यात येईल. याशिवाय, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांसारख्या भाजप नेत्यांच्या रॅलींमध्ये परदेशी निरीक्षक सहभागी होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४BJPभाजपाInternationalआंतरराष्ट्रीयElectionनिवडणूक