भाजप जाहिराती/ जोड वावगे काहीही नाही- आयोगाचा खुलासा
By Admin | Updated: February 6, 2015 22:35 IST2015-02-06T22:35:19+5:302015-02-06T22:35:19+5:30
भाजपने दिल्लीच्या मतदारांना शनिवारी मतदान करण्याचे आवाहन करणाऱ्या जाहिराती प्रसिद्ध केल्या असल्या तरी त्यात चूक काहीही नाही. भाजपने कोणत्याही कायद्याचे उल्लंघन केलेले नाही, असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले. लोक प्रतिनिधी कायदा १९५१ नुसार सिनेमॅटोग्राफ, टीव्ही किंवा तत्सम इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे प्रचारावर निर्बंध आहेत, मात्र मुद्रित माध्यमांसाठी हा नियम लागू होत नाही. त्याबाबत संसदेने निर्णय केलेला आहे, असे निवडणूक आयोगाच्या एका अधिकाऱ्याने नमूद केले. यापूर्वीच्या संपुआ सरकारने निवडणुकीच्या दिवशी वृत्तपत्रांमधून जाहिराती देण्यावर बंदी आणण्यासाठी कायद्यात सुधारणा करण्याची योजना आखली होती. निवडणूक सुधारणांवर विचार करणाऱ्या कायदा समितीकडे हा मुद्दा ठेवण्यात आला असून ही समिती लवकरच अहवाल सादर करेल, असेही सूत्रांनी सांगितले.

भाजप जाहिराती/ जोड वावगे काहीही नाही- आयोगाचा खुलासा
भ जपने दिल्लीच्या मतदारांना शनिवारी मतदान करण्याचे आवाहन करणाऱ्या जाहिराती प्रसिद्ध केल्या असल्या तरी त्यात चूक काहीही नाही. भाजपने कोणत्याही कायद्याचे उल्लंघन केलेले नाही, असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले. लोक प्रतिनिधी कायदा १९५१ नुसार सिनेमॅटोग्राफ, टीव्ही किंवा तत्सम इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे प्रचारावर निर्बंध आहेत, मात्र मुद्रित माध्यमांसाठी हा नियम लागू होत नाही. त्याबाबत संसदेने निर्णय केलेला आहे, असे निवडणूक आयोगाच्या एका अधिकाऱ्याने नमूद केले. यापूर्वीच्या संपुआ सरकारने निवडणुकीच्या दिवशी वृत्तपत्रांमधून जाहिराती देण्यावर बंदी आणण्यासाठी कायद्यात सुधारणा करण्याची योजना आखली होती. निवडणूक सुधारणांवर विचार करणाऱ्या कायदा समितीकडे हा मुद्दा ठेवण्यात आला असून ही समिती लवकरच अहवाल सादर करेल, असेही सूत्रांनी सांगितले.