हरियाणात भाजपाला बहुमत

By Admin | Updated: October 20, 2014 05:43 IST2014-10-20T05:43:04+5:302014-10-20T05:43:04+5:30

विधानसभेची निवडणूक प्रथमच स्वबळावर लढविणाऱ्या भारतीय जनता पार्टीने ४७ जागांसह स्पष्ट बहुमत मिळवत रविवारी हरियाणाची सत्ता काबीज केली

The BJP has a majority in Haryana | हरियाणात भाजपाला बहुमत

हरियाणात भाजपाला बहुमत

चंदीगढ : विधानसभेची निवडणूक प्रथमच स्वबळावर लढविणाऱ्या भारतीय जनता पार्टीने ४७ जागांसह स्पष्ट बहुमत मिळवत रविवारी हरियाणाची सत्ता काबीज केली. गेली १० वर्षे सत्तेवर असलेल्या काँग्रेसला दारुण पराभव पत्करावा लागला. त्यांना गतवेळेच्या तुलनेत २५ जागांचा फटका बसला. गेले एक दशक सत्तेबाहेर राहिलेल्या तुरुंगातील ओम प्रकाश चौटाला यांच्या भारतीय राष्ट्रीय लोकदलास १९ जागांसह विधानसभेतील प्रमुख विरोधी पक्ष होण्यावर समाधान मानावे लागले.
गेल्या निवडणुकीत केवळ चार सदस्य असलेल्या भाजपाला या वेळी मिळालेले दसपटीहून अधिक यश हा मोदीलाटेचा करिष्मा मानला जात आहे. गेल्या वेळी ४० जागा जिंकून, इतरांच्या मदतीने सत्तेवर आलेल्या काँग्रेसला या वेळी फक्त १४ जागांवर समाधान मानावे लागले. लोकदलालाही मोठा फटका बसला व त्यांची सदस्यसंख्या ३१वरून २०पर्यंत खाली आली. राज्याच्या १३ जिल्ह्यांमधून तर या
पक्षाचा पूर्णपणे सफाया झाला आहे. विशेषत: पाच महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत दोन जागा टिकवून ठेवणाऱ्या पक्षाची ही घसरण विशेष लक्षणीय आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: The BJP has a majority in Haryana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.