शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

भाजपाने दिली जनतेला महागाईची भयंकर भेट, प्रियांका गांधी यांनी केली सरकारवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2020 06:38 IST

Priyanka Gandhi : ग्राहक खाद्यान्न मूल्य निर्देशांक १० टक्क्यांच्या वर गेला आहे. सप्टेंबर- ऑक्टोबरमधील आकडे सांगतात की, भाज्यांचे भाव २२.७१ टक्के वाढले आहेत व वाढत आहेत. 

-  शीलेश शर्मा

नवी दिल्ली : बिघडत चाललेली अर्थव्यवस्था आणि वाढत्या महागाईच्या मुद्यावरून मोदी सरकारवर विरोधी पक्ष टीका करत आहेत. बिहार विधानसभा निवडणुकीत रोजगारानंतर महागाई मोठा मुद्दा बनला आहे. महागाईच्या प्रश्नावर काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी सरकारवर हल्ला करताना म्हटले की, ‘‘भाजपाकडून जनतेला दिवाळीची भेट : भयंकर महागाई. भाजपाची त्याच्या भांडवलदार मित्रांना दिवाळीची भेट : ६ विमानतळ, भांडवलदारांची सोबत, भांडवलदारांचा विकास” प्रियंका गांधी यांच्या ट्वीटसोबत नेते राहुल गांधी यांनीही ट्वीट केले : “देशाच्या शेतकऱ्यांनी मागितली मंडई, पीएमनी दिली भयानक मंदी.’’या दोन्ही नेत्यांनी टीका भाज्या, फळे, डाळी आदी दैनंदिन गरजांच्या वस्तुंचे भाव वाढल्यानंतर केली आहे. बाजार भावाबद्दल बोलायचे तर बटाटे व कांदे किलोला ५० ते ९० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. कृषी मंत्रालयाचे आकडे सांगतात की, २०१८-२०१९ मध्ये बटाटे कोल्ड स्टोरेज भांडारमध्ये २३८ लाख टनांपेक्षा जास्त होता तो २०२० मध्ये २१४ लाख टनांवर आला. हिच परिस्थिती डाळी आणि दुसऱ्या दैनंदिन गरजेच्या वस्तुंची आहे.भाजपाशी युती करण्यापेक्षा राजकारण संन्यास घेईन.

ग्राहक खाद्यान्न मूल्य निर्देशांक १० टक्क्यांच्या वर गेला आहे. सप्टेंबर- ऑक्टोबरमधील आकडे सांगतात की, भाज्यांचे भाव २२.७१ टक्के वाढले आहेत व वाढत आहेत. हीच परिस्थिती कमीअधिक डाळींची आहे. त्यांचे भाव १४ टक्क्यांनी वाढले आहे. गेल्या १० वर्षांत यंदा प्रथमच बटाट्याचे भाव ५० ते ६० रूपये किलो झाले आहेत. २०१९ मध्ये जो कांदा साधारण ४५ रुपये किलो होता तोच २०२० मध्ये ११० रुपये किलो विकला गेला. याचा अर्थ तो १४३ टक्के महाग झाला. आज उडिदाची डाळ १०६ रुपये किलो, तुरीची डाळ १०७ रुपये, मसूर डाळ ७८ रुपये किलो, मूग डाळ  १०३ रुपये किलो मिळत आहे. 

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपा