शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

'भाजपानं प्रभू रामचंद्रांची फसवणूक केली'

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2018 18:25 IST

प्रभू रामाची फसवणूक भाजपाला 2019 मध्ये महागात पडेल, असंही ते म्हणाले

BJP has cheated Ram, winning 2019 elections will be difficult: Ayodhya priestअयोध्या: भाजपानं प्रभू रामाची फसवणूक केली, असं विधान राम जन्मभूमी मंदिराचे प्रमुख संत आचार्य एस. दास यांनी केलं आहे. भाजपा प्रभू रामाचं नाव घेऊन सत्तेत आली. मात्र त्यानंतर त्यांना रामाचा पूर्णपणे विसर पडला, असा आरोप दास यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना केला. 'भाजपाला 2019 मधील लोकसभा निवडणूक जिंकायची असल्यास, त्यांनी आता राम मंदिराच्या उभारणीला सुरुवात करावी. अन्यथा आगामी निवडणूक जिंकणं भाजपाला जड जाईल,' असं आचार्य दास म्हणाले. काही तासांपूर्वीच चवानी मंदिराचे महंत परमहंस दास यांनी राम मंदिराचं बांधकाम तातडीनं सुरू न केल्यास भाजपाविरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता. यानंतर आता राम जन्मभूमी मंदिराचे प्रमुख संत आचार्य दासदेखील या मुद्यावरुन आक्रमक झाले आहेत. 'त्यांना (भाजपाला) 2019 मध्ये सत्ता राखायची असल्यास, राम मंदिराची उभारणी करावी लागेल. अन्यथा आम्ही त्यांच्याविरोधात आंदोलन सुरू करुन त्यांचा पराभव होईल, याची काळजी घेऊ,' असा इशारा महंत परमहंस दास यांनी भाजपाला दिला होता. 2019 च्या लोकसभा निवडणुकीचा विचार करता राम मंदिर आणि हिंदुत्व हे मुद्दे भाजपाच्या अजेंड्यावर नाहीत, असं केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी म्हटलं होतं. पुढील निवडणूक भाजपा विकासाच्या मुद्यावर लढवेल, असंही नक्वींनी म्हटलं होतं. त्याचे तीव्र पडसाद सध्या पाहायला मिळत आहेत.  

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीLoksabhaलोकसभाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९