लक्षद्वीप - यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षाने दणदणीत विजय मिळवला. लोकसभेत पुन्हा एकदा स्पष्ट बहुमत मिळवताना गतवेळपेक्षा अधिक चांगली कामगिरी करत थेट तीनशेपार मजल मारली. बहुतांश राज्यांत निर्विवाद यश मिळवले. पण एका मतदारसंघात मात्र भाजपाचा दारुण पराभव झाला. अवघ्या सव्वाशे मतांवर भाजपाला समाधान मानावे लागले.
या मतदारसंघाचे नाव आहे लक्षद्वीप. केंद्रशासित प्रदेश असलेल्या लक्षद्वीपमध्ये भाजपाने कादर हाजी यांना उमेदवारी दिली होती. मात्र त्यांना मतदारसंघात फारसा प्रतिसाद मिळाला नाही. अखेर त्यांना अवघ्या 125 मतांवर समाधान मानावे लागले. केवळ नोटाला भाजपापेक्षा कमी म्हणजे 100 मते मिळाली.