शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

मिझोरममध्ये काँग्रेसला तगडा झटका, सहकाऱ्याचा पराभव  होऊनही भाजपाची लागली 'लॉटरी'

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2023 23:38 IST

महत्वाचे म्हणजे, स्वतः मुख्यमंत्री जोरमथंगा यांनाही आपली जागा राखता आली नाही.

तीन राज्यांमध्ये झालेल्या पराभवानंतर आता मिझोरममध्येही काँग्रेसला तगडा झटका बसला आहे. गेल्या 36 वर्षांपासून येथे मिझो नॅशनल फ्रंट आणि काँग्रेसचाच कब्जा होता. यावेळी नवा पक्ष असलेल्या जोरम पिपल्स मूव्हमेन्टने 40 पैकी 27 जागांवर विजय मिळवला आहे. एमएनएफला पराभूत केल्यानंतर, ZPM सरकार बनविण्यासाठी तयार आहे. तर येथे काँग्रेसला केवळ एकच जागा मिळाली आहे. भाजपलाही येथे केवळ दोनच जागा मिळाल्या आहेत. महत्वाचे म्हणजे, स्वतः मुख्यमंत्री जोरमथंगा यांनाही आपली जागा राखता आली नाही.

तीन वेळा मुख्यमंत्री झालेले जोरमथंगा हे आयझॉल पूर्व फर्स्ट जागेवरून निवडणुकीच्या मैदानात होते. जोरमथंगा यांनी राज्यपाल हरी बाबू कुंभमपती यांची भेट घेऊन त्यांच्याकडे आपला राजीनामा सोपवला आहे. तसेच, झेडपीएमचे मुख्यमंत्री पदाचे  दावेदार असलेले लालदुहोमा यांनी मोठा विजय मिळवला आहे. आयजॉलमध्ये झेडपीएमने सर्वच्या सर्व 10 ही जागांवर विजय मिळवला आहे. उपमुख्यमंत्री तॉनलुइया यांनाही पराभवाचा सामना करावा लागला आहे.

या निवडणुकीत भाजपला साइहा आणि पलक जागांवर विजय मिळाला आहे. येथे जातीय अल्पसंख्यक समूदाय राहतो. या विजयाबरोबरच भाजपने या राज्यात आपली पकड मजबूत करायला सुरुवात केली आहे. भाजपला 2018 च्या निवडणुकीत मिझोरममध्ये केवळ एक जागा मिळाली होती. 

काँग्रेसला झटका -केंद्रात एनडीएचा सहकारी पक्ष असलेल्या एमएनएफचा पराभव  झाला असला तरी, सर्वात मोठा झटका काँग्रेसला बसला आहे. राज्यात सत्तेत आणि विरोधी पक्ष म्हणून राहणाऱ्या काँग्रेसला आता केवळ एकच जाता जिंकता आली आहे. मात्र भाजपच्या जागांमध्ये वाढ झाली आहे. 

टॅग्स :mizoram assembly electionमिझोराम विधानसभा निवडणूक २०२३congressकाँग्रेसBJPभाजपाPoliticsराजकारणElectionनिवडणूक