शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

BJP Foundation Day 2023: भाजपचा आज स्थापना दिवस, अडवाणी, मोदी, शहा यांचा 'तो' फोटो होतोय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2023 11:48 IST

BJP Foundation Day 2023: आज भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिवस आहे.

भारतीय जनता पार्टीचा आज स्थापना दिवस आहे. भाजपची स्थापना ६ एप्रिल १९८० ला झाली. १९८४ च्या पहिल्या निवडणुकीत भाजपला २ जागा मिळाल्या होत्या. आज भाजपचे ३०३ खासदार आहेत, जगातील सर्वात मोठा पक्ष म्हणून आज भाजपची ओळख आहे. दरम्यान, आज भाजप देशभरात स्थापना दिवस साजरा करत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शहा यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा फोटो १९८९ च्या दरम्यानचा असल्याचे बोलले जात आहे. 

१९८७ मध्ये अमित शहा आणि नरेंद्र मोदी या दोन्ही नेत्यांनी भाजपामध्ये काम सुरू केले. स्थापना दिनानिमित्त सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे, यामध्ये नरेंद्र मोदी, लालकृष्ण अडवाणी आणि अमित शहा दिसत आहेत. या फोटोवर नेटकरी वेगवेगळ्या पद्धतीने कमेंट करत आहेत. 

Repo Rate RBI : हुश्श... रेपो रेट वाढीला तूर्तास 'ब्रेक', EMI वाढीने त्रस्त कर्जदारांना RBIचा दिलासा

ट्विटरवर हा फोटो व्हायरल झाला आहे. हा फोटो १९८९ च्या दशकातील असल्याचे सांगण्यात आले आहे. हा फोटो १९८९ सालचा आहे. या फोटोत लालकृष्ण अडवाणी आणि नरेंद्र मोदी बसलेले दिसत आहेत. लालकृष्ण अडवाणींच्या बाजूला  अमित शहा नरेंद्र मोदींच्या मागे उभे आहेत, टेबलावरची कागदपत्रे बघत आहेत. हा फोटो त्याच वर्षीचे आहे ज्या वर्षी केंद्रात भाजपला मोठा विजय मिळाला होता. १९८४ मध्ये लोकसभेच्या २ जागा जिंकणाऱ्या भाजपने १९९८ च्या लोकसभा निवडणुकीत ८५ जागा जिंकल्या. यंदा भाजपला मिळालेल्या मतांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. १९८४ मध्ये भाजपला एकूण १.८२ कोटी मते मिळाली होती, जी १९८९ मध्ये वाढून ३.४१ कोटी झाली. 

अमित शहा आणि नरेंद्र मोदी हा फोटो काढण्याच्या दोन वर्षांपूर्वीच  एबीव्हीपी मधून भारतीय जनता पक्षात गेले. अमित शहा यांना अहमदाबादमधून भाजपचे सचिव करण्यात आले. यावेळी नरेंद्र मोदी भारतीय जनता पक्षाच्या गुजरात युनिटचे सरचिटणीस होते. नरेंद्र मोदींसाठी हे वर्ष वाईट गेले. याच वर्षी पीएम मोदींच्या वडिलांचे निधन झाले होते. दरम्यान, पंतप्रधान मोदींच्या वडिलांच्या मृत्यूशी संबंधित एक किस्सा सर्वत्र चर्चिला जातो.

मोदी यांच्या वडिलांचे निधन झाले त्याच दिवशी भाजपची महत्त्वाची बैठक होणार होती. विश्व हिंदू परिषदेचे सरचिटणीस दिलीप त्रिवेदी यांनी सांगितले की, नरेंद्र मोदी त्या बैठकीला हजर राहणार होते, पण त्यांच्या वडिलांचे निधन झाले आहे त्यामुळे ते येणार नाहीत असे पक्षाचे सदस्य गृहीत धरत होते. मात्र वडिलांचे अंत्यसंस्कार झाल्यानंतर लगेचच नरेंद्र मोदी थेट पक्षाच्या बैठकीला हजर राहिले होते.

टॅग्स :BJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शाह