शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

BJP Foundation Day 2023: भाजपचा आज स्थापना दिवस, PM नरेंद्र मोदी खासदार-कार्यकर्त्यांना संबोधित करणार, 14 एप्रिलपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2023 07:37 IST

BJP Foundation Day 2023: भाजपच्या स्थापना दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी देशभरातील कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत.

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्ष (भाजप) आज (६ एप्रिल) आपला स्थापना दिवस साजरा करणार आहे. स्थापना दिनानिमित्त आठवडाभर विशेष कार्यक्रमही आयोजित करण्यात येणार असून, त्यात सेवेला महत्त्व देण्यात येणार आहे. यावेळी केंद्र सरकारने जारी केलेल्या कल्याणकारी योजनांची माहिती भाजप  लोकांपर्यंत पोहोचवणार आहे. आतापर्यंत भाजप आपल्या लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी डिजिटल स्वरूपावर अधिक भर देत असे, परंतु यावेळी ते जुन्या पद्धती देखील वापरणार आहेत. यामध्ये वॉल लेखन आणि पोस्टर मोहीम असणार आहे.

भाजपच्या स्थापना दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी देशभरातील कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत. यानंतर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डाही विविध कार्यक्रमांतून पक्षाचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवणार आहेत. सर्व राज्यांमध्ये मुख्यमंत्री, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार-आमदार आपापल्या भागात कार्यक्रम आयोजित करून लोकांना पक्षाच्या धोरणांची माहिती देतील. सर्व जिल्हा, मंडळ आणि बूथ समित्यांच्या स्तरावर दिल्लीत सुमारे 14,000 ठिकाणी स्थापना दिनाचे छोटे-मोठे कार्यक्रम आयोजित केले जातील. दरम्यान, पंतप्रधान मोदींचा स्थापना दिनाचा संदेश कार्यकर्ते एकत्रितपणे ऐकणार आहेत.

दररोज नवीन कार्यक्रमभाजपच्या युवा मोर्चातर्फे सामाजिक न्याय सप्ताहांतर्गत ७ एप्रिल रोजी वैद्यकीय शिबिर व रोजगार समुपदेशन शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. 8 एप्रिलला अनुसूचित जाती आघाडी आणि अल्पसंख्याक आघाडी संयुक्तपणे आत्मनिर्भर भारत योजनेंतर्गत युवकांमध्ये स्वावलंबनासाठी कार्यक्रम आयोजित करणार आहे. ९ एप्रिला किसान मोर्चा नैसर्गिक शेती, यमुना स्वच्छता आणि श्री अन्न (मिलट्स) योजनेबाबत जनजागृती मोहीम सुरू करण्यात येईल. तसेच, 10 एप्रिल रोजी दिल्ली भाजपा महिला मोर्चा अनुसूचित जाती बहुल भागातील महिलांसोबत जेवणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येणा आहे.

याचबरोबर, 11 एप्रिलला ओबीसी मोर्चातर्फे जोतिबा फुले यांची जयंती साजरी करण्यात येणार आहे. 12 एप्रिलला दिल्ली भाजप पूर्वांचल मोर्चा पूर्वांचल लोकसंख्या असलेल्या भागात वैद्यकीय शिबिरे आयोजित करणार आहे. 13 एप्रिलला भाजपचे कार्यकर्ते पाणवठे स्वच्छ करून वृक्षारोपण करण्याचा कार्यक्रम सुरू करणार आहेत. तसेच, 14 एप्रिलला पक्षाचे पदाधिकारी आणि अनुसूचित जाती मोर्चाचे कार्यकर्ते एकत्रितपणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करतील.

टॅग्स :BJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी