शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

भाजपचे मिशन २०२४ : विरोधी पक्षांच्या एकजुटीत फूट पाडण्याचा फॉर्म्युला; खास रणनीतीवर काम करू शकते

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2023 10:51 IST

उत्तर प्रदेश-पंजाबपासून दक्षिण भारतापर्यंत भाजप त्या पक्षांशी युती करण्याचा प्रयत्न करू शकते, जे अजूनही विरोधी ऐक्यापासून दूर आहेत.

नवी दिल्ली : आगामी वर्षात म्हणजेच २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election 2024) आतापासूनच सर्व राजकीय पक्षांनी जोरदार तयारी करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपविरोधात लढण्यासाठी विरोधी पक्ष एकत्र येत आहेत. अलीकडेच पाटणा येथे विरोधी पक्षांची एक बैठक झाली. या बैठकीत २० हून अधिक विरोधी पक्ष सहभागी झाले होते. मात्र आता भाजपने विरोधी पक्षांची एकजूट तोडण्याचा फॉर्म्युला शोधला असल्याचे म्हटले आहे. यासाठी भाजप विशेष रणनीतीवर काम करू शकते. 

उत्तर प्रदेश-पंजाबपासून दक्षिण भारतापर्यंत भाजप त्या पक्षांशी युती करण्याचा प्रयत्न करू शकते, जे अजूनही विरोधी ऐक्यापासून दूर आहेत. एका विशेष रणनीती अंतर्गत, भाजप देशभरातील सर्व ५४३ लोकसभा जागांवर लक्ष ठेवण्यासाठी तीन झोन तयार करू शकते आणि त्या सर्वांचे वेगवेगळे प्रभारी असतील. उत्तर प्रदेश, बिहारमध्ये ज्या पक्षाची कामगिरी चांगली आहे, त्यांना सरकार स्थापन करणे सोपे जाते, असे म्हटले जाते. त्यामुळे उत्तर प्रदेशात भाजप पुन्हा एकदा ओमप्रकाश राजभर यांचा पक्ष एसबीएसपीसोबत हातमिळवणी करू शकतो. दोघेही जुने मित्र आहेत. याचा फायदा पूर्वांचलमध्ये भाजपला होऊ शकतो. 

भाजप बिहारमध्ये मांझी, व्हीआयपी पक्षाचे मुकेश साहनी आणि रामविलास पासवान यांचा मुलगा चिराग पासवान यांना आपल्यासोबत घेऊ शकते. दरम्यान, चिराग पासवान यांचे काका आधीच एलजेपी कोट्यातून एनडीएमध्ये मंत्री आहेत. अशाप्रकारे भाजप बिहारमध्ये नितीश-लालूंच्या विरोधात घेराव घालणार आहे. याचबरोबर, दक्षिणेत कर्नाटक विधानसभा निवडणुकीत सत्ता गमावल्याने आता भाजप आगामी लोकसभा निवडणुकीत फारसे नुकसान होणार नाही, यासाठी देवेगौडांच्या पक्ष जेडीएसशी हातमिळवणी करू शकते. भाजप आणि जेडीएस एकत्र आल्यास कर्नाटकात त्यांचे मताधिक्य ५० टक्क्यांच्या जवळपास पोहोचू शकतो. 

तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमध्ये ताकदीसाठी भाजप चंद्राबाबू नायड यांच्या पक्ष टीडीपीसोबत येऊ शकतो. दोघांची यापूर्वी युती आहे. टीडीपीसोबत युती केल्यास आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या दोन्ही राज्यात भाजपची ताकद वाढू शकते. भाजप पुन्हा एकदा आपला जुना भागीदार शिरोमणी अकाली दल (एसएडी) सोबत एकत्र येऊ शकतो. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी दोन्ही पक्षांमध्ये समझोता होण्याची शक्यता आहे, कारण भाजपला पंजाबमध्ये काँग्रेस आणि आपच्या आव्हानावर मात करायची असेल तर अकालींचा पाठिंबा प्रभावी ठरू शकतो. तसेच, उत्तर प्रदेश, बिहार, पंजाब आणि दक्षिणमधून भाजपला जास्त जागा मिळाल्या तर बहुमताचा २७२ चा आकडा पार करणे फारसे अवघड जाणार नाही.

टॅग्स :BJPभाजपाlok sabhaलोकसभाElectionनिवडणूक