भाजप आमदाराच्या पुत्राकडून गोळीबार
By Admin | Updated: March 23, 2015 01:28 IST2015-03-23T01:28:33+5:302015-03-23T01:28:33+5:30
मध्यप्रदेशमधील भाजपचे आमदार तुकोजी राव पौड यांचा पुत्र व त्याच्या मित्रांनी केलेल्या गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या २५ वर्षीय तरुणाचा रविवारी रुग्णालयात मृत्यू झाला.

भाजप आमदाराच्या पुत्राकडून गोळीबार
इंदूर : मध्यप्रदेशमधील भाजपचे आमदार तुकोजी राव पौड यांचा पुत्र व त्याच्या मित्रांनी केलेल्या गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या २५ वर्षीय तरुणाचा रविवारी रुग्णालयात मृत्यू झाला. देवास जिल्ह्यातील राघवगड येथे चार दिवसांपूर्वी गोळीबाराची ही घटना घडली होती.
प्रयत्न करूनही प्रताप लोधी या तरुणाला वाचविण्यात अपयश आले आहे, असे डॉक्टरांनी सांगितले. या संदर्भात पौड यांचा पुत्र विक्रम याच्या पाच मित्रांना अटक करण्यात आली आहे, तर विक्रम फरार आहे. १८ मार्चला विक्रम व त्याच्या मित्रांचे शेतकऱ्यांसोबत जमिनीच्या वादातून भांडण झाले होते. या भांडणादरम्यान विक्रम व त्याच्या मित्रांनी गोळीबार केला होता.ज्यात एका महिलेसह चार जण जखमी झाले होते. त्यात प्रताप लोधी हा गंभीर जखमी झाला होता. (वृत्तसंस्था)