Tamil Nadu Assembly Elections: केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी आगामी तामिळनाडूच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी घोषणा केली आहे. AIADMK पक्षाचे नेते ई. पलानीस्वामी हे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) चे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार असतील. या घोषणेसह सत्ताधारी DMK सरकारला आव्हान देण्यासाठी एनडीए पूर्ण ताकदीने मैदानात उतरणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
एनडीएला विजयाचा विश्वास
चेन्नई येथे माध्यमांशी बोलताना पीयूष गोयल म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात आणि पलानीस्वामी यांच्या नेतृत्वाखाली तमिळनाडूत एनडीए सरकार स्थापन होईल. डीएमके सरकार लोकांच्या अपेक्षांवर अपयशी ठरल्याचा आरोप करत त्यांनी म्हटले की, राज्यातील जनता आता एक मजबूत आणि विश्वासार्ह पर्याय शोधत आहे.
द्रमुक सरकारवर टीका
एनडीए सत्तेत आल्यास राज्याला स्थिर आणि विकासाभिमुख सरकार मिळेल, असा दावा गोयल यांनी केला. डीएमके सरकारवर युवक, शेतकरी आणि महिलांसाठी प्रभावी काम न केल्याची टीका गोयल यांनी केली. तसेच, सध्याचे सरकार भ्रष्ट आणि कमकुवत झाले असून राज्यकारभार करण्याचा नैतिक अधिकार त्यांनी गमावल्याचा दावाही त्यांनी केला.
उदयनिधी स्टालिन यांच्यावर टीका
उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टालिन यांना मंत्रिमंडळातून हटवण्याची मागणीही गोयल यांनी केली. सनातन धर्माबाबत दिलेल्या त्यांच्या वक्तव्यांचा उल्लेख करत, अशा प्रकारची विधाने संवैधानिक पदावर असलेल्या व्यक्तीला शोभत नाहीत, असे त्यांनी म्हटले. दरम्यान, पलानीस्वामी यांना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करून एनडीएने निवडणुकीपूर्वीच नेतृत्वाबाबत कोणताही संभ्रम ठेवलेला नाही.
एनडीएचा विस्तार
तमिळनाडूत एनडीए आपली ताकद वाढवत आहे. अम्मा मक्कल मुनेत्र कळगम (AMMK) आणि पट्टाली मक्कल काची (PMK) यांच्या सहभागामुळे युती अधिक मजबूत झाली आहे. हे सर्व पंतप्रधान मोदी यांच्या मदुरै दौऱ्याच्या काही दिवस आधी घडले आहे. एकीकडे सत्ताधारी DMK, तर दुसरीकडे भाजपला मिळालेली स्थानिक पक्षांची साथ, यामुळे यंदाची निवडणूक रंजक ठरणार आहे.
अन्नामलाई कोणत्या भूमिकेत?
ई. पलानीस्वामी यांना आगामी निवडणुकीत मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार घोषित केल्यानंतर, भाजपचे राज्यातील लोकप्रिय नेते के. अन्नामलाई यांचे काय होणार? असा प्रश्न उपस्थित होतोय. अन्नामलाई यांना पलानीस्मावी यांच्याखाली काम करावे लागेल की, त्यांना पक्षाकडून इतर काही जबाबदारी दिली जाईल, हे पाहणे महत्वाचे आहे.
Web Summary : Piyush Goyal announced AIADMK's E. Palaniswami as NDA's CM candidate for Tamil Nadu. He criticized the DMK government, promising a stable, development-oriented government if NDA wins. The alliance strengthens with AMMK and PMK, setting the stage for a competitive election.
Web Summary : पीयूष गोयल ने AIADMK के ई. पलानीस्वामी को तमिलनाडु के लिए NDA के मुख्यमंत्री पद का उम्मीदवार घोषित किया। उन्होंने DMK सरकार की आलोचना करते हुए NDA के जीतने पर स्थिर, विकासोन्मुखी सरकार का वादा किया। AMMK और PMK के साथ गठबंधन मजबूत हुआ, जिससे चुनाव प्रतिस्पर्धी होने की उम्मीद है।