शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाची 250 उमेदवारांची यादी तयार; अडवाणी, जोशींचं तिकीट कापणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2019 11:59 IST

तरुणांना संधी देण्यासाठी दिग्गजांना डच्चू मिळण्याची शक्यता

नवी दिल्ली: प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसनं लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची नावं जाहीर केलेली असली, तरी अद्याप सत्ताधारी भाजपानं उमेदवारांची घोषणा केलेली नाही. भाजपानं जवळपास 250 उमेदवारांची यादी तयार केली आहे. ही यादी पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसेल, अशी माहिती पक्षातील सूत्रांनी दिली. भाजपाच्या संसदीय समितीनं उमेदवार यादी तयार केली असून अनेक दिग्गजांना डच्चू देण्यात आल्याची माहितीदेखील त्यांनी दिली. त्यामुळे मार्गदर्शक मंडळातील लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांना तिकीट मिळणार का, याची चर्चा सुरू झाली आहे. उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री बी. सी खंडुरी आणि बी. एस. कोश्यारी यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षानं तरुणांना संधी द्या, अशी भूमिका या दोन्ही नेत्यांनी घेतली आहे. माजी केंद्रीय मंत्री कलराज मिश्र (2014 मध्ये देवरियामधून विजयी) आणि लोकसभेचे माजी उपाध्यक्ष करिया मुंडा यांनीदेखील लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षातील अनेक ज्येष्ठ नेत्यांनी स्वत:हून निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्यानं आता मार्गदर्शक मंडळातील नेत्यांचं काय होणार हा प्रश्न निर्माण झाला आहे. लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्यासह हिमाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शांता कुमार स्वत: माघार घेणार की तरुणांना संधी देण्यासाठी पक्षाकडून त्यांची तिकीटं कापली जाणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सध्या अडवाणींचं वय 91 वर्षे, तर जोशींचं वय 85 वर्षे आहे. 2014 मध्ये या दोन्ही नेत्यांचा समावेश मार्गदर्शक मंडळात करण्यात आला. पंचाहत्तरी पूर्ण केलेल्या नेत्यांना उमेदवारी न देण्याचा निर्णय भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं काही महिन्यांपूर्वी घेतला आहे.  

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकLal Krishna Advaniलालकृष्ण अडवाणीNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा