शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

भाजपने बंगाल व राजस्थानच्या नेत्यांना उतरवले मैदानात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2023 05:48 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवेदनाची मागणी करीत कामकाज चालू दिले नाही.

संजय शर्मा । लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : संसदेत मणिपूरवरील विरोधकांच्या गदारोळाला उत्तर देण्यासाठी सत्तारूढ भाजपने पश्चिम बंगाल व राजस्थानच्या नेत्यांना मैदानात उतरवले व मणिपूरसारखी स्थिती या राज्यांत असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न केला. भाजप खा. लॉकेट चटर्जी यांना तर रडू कोसळले. संसद अधिवेशनातील सलग दुसऱ्या दिवशी मणिपूरच्या मुद्द्यावरून विरोधकांनी गदारोळ केला. आजही विरोधकांनी मणिपूरच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवेदनाची मागणी करीत कामकाज चालू दिले नाही.

विरोधकांच्या मणिपूर मुद्द्याच्या उत्तरात सत्ताधारी पक्षाने पश्चिम बंगालचे नेते सुकांतो मजूमदार व लॉकेट चटर्जी यांना मैदानात उतरवून बंगालची स्थिती तर मणिपूरपेक्षाही जास्त वाईट असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न केला. राजस्थानबाबत केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी पत्रपरिषद घेतली व राजस्थानमध्ये तर काँग्रेसचे सरकार असून, मणिपूरपेक्षा जास्त वाईट स्थिती असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न केला. 

संसदेतील तिढा सोडविण्याचा प्रयत्न संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी विरोधी नेत्यांशी चर्चा करून संसदेतील तिढा सोडविण्याचा प्रयत्न केला. सरकारने गृहमंत्री अमित शाह यांचे निवेदन संसदेसमोर ठेवण्याची तयारी दर्शवली. परंतु विरोधक मणिपूरचा मुद्दा सोडण्यास तयार नसल्यामुळे यावर तोडगा निघाला नाही. राज्यसभेत सरकारने नियम १७६नुसार चर्चा करण्याची तयारी दर्शवली. परंतु विरोधक नियम २६७ नुसार चर्चा करण्यावर अडून बसले होते.

टॅग्स :BJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीManipur Violenceमणिपूर हिंसाचार