भाजपा, संघाला मराठा आरक्षण नको
By Admin | Updated: August 28, 2015 23:37 IST2015-08-28T23:37:10+5:302015-08-28T23:37:10+5:30

भाजपा, संघाला मराठा आरक्षण नको
>नारायण राणे : बीड जिल्ह्यातील दुष्काळी भागाची पाहणी बीड : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजपा व शिवसेना पूर्वीपासूनच मराठा आरक्षणाला विरोध करीत आहेत. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असेपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही, असा आरोप माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी शुक्रवारी येथे केला.जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी केल्यानंतर शासकीय विश्रामगृहातील पत्रकार परिषदेत ते म्हणाले, मराठा आरक्षणाचा अभ्यासपूर्ण अहवाल बनविला होता. त्याचे कौतुक झाले. मात्र कोर्टात सरकारची बाजू मांडताना भाजपा सरकार कमी पडले. गुजरातमध्ये हार्दिक पटेल यांनी जसा आरक्षणाचा लढा उभा केला आहे त्या प्रकारे महाराष्ट्रातील मराठा समाजाने एकी दाखवावी. एका बाजूला शेतकर्यावर नैसर्गिक संकट ओढावले आहे तर दुसर्या बाजूला शासकीय यंत्रणा ठप्प झाली आहे. मराठवाड्यावर एकाच वेळी सुलतानी व नैसर्गिक संकट आले आहे. राणे यांनी शिरुर कासार तालुक्यातील खालापुरी, बीड तालुक्यातील लिंबागणेश, औरंगपुर, रुई गावांची पाहणी केली. (प्रतिनिधी)-----------------पाणी द्या !मालदीवच्या लोकांना विमानामार्फत पाणी नेऊन देण्याचे पाऊल मोदी सरकारने उचलले आहे. मराठवाड्यातील लोकांना पाण्याची गरज आहे. त्यांच्याही पाण्याचे नियोजन करावे, अशी मागणी राणे यांनी केली.--------------दीर्घकालीन उपायांची गरज - शेी शासनाकडून शेती व्यवसायासाठी जोपर्यंत दीर्घकालीन उपाययोजना राबविण्यात येणार नाहीत, तोपर्यंत शेतकर्यांच्या आत्महत्या थांबणार नाहीत, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खा. राजू शेी यांनी नांदेडमध्ये सांगितले.-----------दिल्लीला मोर्चा - रघुनाथ पाटील शेतकर्यांना एकरी ५० हजार रुपये नुकसान भरपाई मिळावी, उत्पादन खर्चावर आधारित शेतमालाला भाव मिळावा आजी मागण्यांसाठी दिल्लीत २ ऑक्टोबरला देशभरातील शेतकरी संघटना मोर्चा काढणार असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ पाटील यांनी नगरमध्ये दिली. ---------------साधुसंत योग्यतेचे आहेत का?सरकार हिंदुत्ववाद्यांचे आहे म्हणून नाशिकला होणार्या कुंभमेळ्यासाठी कोट्यवधी रुपये दिले़ मात्र, हे साधुसंत त्या योग्यतेचे आहेत का? सरकार धार्मिकता पसरवत आहे़ तेच पैसे शेतकर्यांसाठी का वापरले जात नाहीत? दुष्काळात छावण्या सुरु न करता सरकारने शेतकर्यांना घरीच जनावरे सांभाळण्यासाठी पैसे द्यावेत, अशी मागणी पाटील यांनी केली.