शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

निकालातील ‘ती’ परंपरा भाजपने माेडली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2024 10:12 IST

ज्याचे राज्यात सरकार, त्याचा व्हायचा लाेकसभेत पराभव

- ललित झांबरेडेहराडून : भाजपाने गेल्या १० वर्षांत देशावर बहुमतासह सत्ता करताना अनेक विक्रम केले आहेत आणि त्यादरम्यान काही समजही गैरसमज असल्याचे सिद्ध केले आहे.   गेल्या वेळच्या आपल्या यशाने उत्तराखंडबद्दलचा असाच एक समज त्यांनी गैरसमज असल्याचे सिद्ध केले आहे. 

हा समज म्हणजे २०१९ पर्यंत असे मानले जात होते की, उत्तराखंड राज्यात ज्या पक्षाचे सरकार असते त्या पक्षाला लोकसभा निवडणुकीत यश मिळत नाही. २००४ ते २०१४ पर्यंत झालेल्या तीन निवडणुकांमध्ये असे घडलेही होते; पण २०१९ मध्ये भाजपाने उत्तराखंडमध्ये सत्तेत असताना लोकसभेचाही आखाडा जिंकला होता. उत्तराखंडमध्ये लोकसभेच्या पाच जागा असून, भाजपने २०१९ मध्ये या पाचही जागांवर विजय मिळवला होता. 

देवभूमी म्हणून बोलले जाणारे उत्तराखंड सन २००० मध्ये अस्तित्वात आले. त्याआधी हे राज्य उत्तर प्रदेशचा भाग होते. राज्य निर्मितीनंतर उत्तराखंडमध्ये लोकसभेच्या चार निवडणुका झाल्या आहेत. 

कधीपासून झाली सुरूवातया परंपरेची सुरुवात २००४ मध्ये झाली. त्यावेळी येथे नारायणदत्त तिवारी यांच्या नेतृत्वात काँग्रेसचे राज्य होते; पण लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला फक्त नैनितालचीच जागा जिंकता आली होती. २००९ मध्ये उत्तराखंड भाजपकडे होते. त्यावेळी निवृत्त मेजर जनरल बी.सी. खांडुरी मुख्यमंत्री होते. राज्यात सत्तेत असले तरी भाजपाला त्यावेळी राज्यात लोकसभेची एकही जागा जिंकता आली नव्हती. २०१४ च्या निवडणुकीवेळी काँग्रेसच्या हरीश रावत यांचे सरकार राज्यात सत्तेवर होते; पण देशभरात असलेली मोदी लाट देवभूमीतही बघायला मिळाली आणि भाजपाने सर्वच्या सर्व पाचही जागा जिंकल्या. 

भाजप पुनरावृत्ती करणार?राज्यात ज्याची सत्ता त्याला लोकसभेत अपयश ही मालिका अखेर २०१९ मध्ये भाजपने खंडित केली. त्रिवेंद्रसिंह रावत यांच्या नेतृत्वात राज्यात भाजपा सत्तेवर असतानाही लोकसभेच्या पाचही जागांवर कमळ फुलले. उत्तराखंडमध्ये पहिल्यांदाच राज्यात ज्याची सत्ता त्याच पक्षाला लोकसभा निवडणुकीतही यश मिळाले. आता पुन्हा राज्यात भाजपच सत्तेवर आहे, हे विशेष.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४BJPभाजपा