शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Video - "काँग्रेसकडे नेता नाही, नीतीही नाही; पराभव दिसतो तेव्हा ते मोदींना शिव्या देणं सुरू करतात"

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2022 10:02 IST

BJP Devendra Fadnavis And Congress महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुजरातमध्ये काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. "

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (BJP Devendra Fadnavis) यांनी गुजरातमध्ये काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. "निवडणूक जवळ येतेय तसा काँग्रेसला त्यांचा पराभव स्पष्टपणे दिसत आहे. आजपर्यंतचा इतिहास पाहा, काँग्रेसला जेव्हा जेव्हा त्यांचा पराभव होताना दिसलं तेव्हा तेव्हा काँग्रेसचे नेते मोदींना शिव्या देणं सुरू करतात" असं म्हणत टीकास्त्र सोडलं आहे. तसेच "काँग्रेसचा आतापर्यंतचा सर्वात वाईट पराभव या निवडणुकीत होईल आणि भाजपाचा मोठा विजय होईल" असं देखील फडणवीसांनी म्हटलं आहे. 

देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून य़ाबाबत एक ट्विट केलं आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. "जसजशी निवडणूक जवळ येत आहे तसतसा काँग्रेसला त्यांचा पराभव खूप स्पष्टपणे दिसत आहे. आजपर्यंतचा इतिहास पाहा, काँग्रेसला जेव्हा जेव्हा त्यांचा पराभव होताना दिसलं तेव्हा तेव्हा काँग्रेसचे नेते मोदींना शिव्या देणं सुरू करतात. मोदींच्या विकासाच्या मॉडेलला काहीही तोड नाही, त्यापेक्षा मोठं मॉडेल आपण दाखवू शकत नाही आणि त्याचा विचारही करू शकत नाही, असं काँग्रेस नेत्यांना लक्षात येतं तेव्हा ते मोदींना शिव्या देणं सुरू करतात" असं म्हटलं आहे. 

"काँग्रेसकडे नेताही नाही, नीतीही नाही..."

"काँग्रेसचे अध्यक्षांनी मोदींविषयी अपशब्द काढून हे सिद्ध केलं की काँग्रेसने पराभव स्वीकारला आहे. त्यांच्याकडे मोदींच्या विकासाच्या मॉडेलला काहीही उत्तर नाही. त्यांच्याकडे नेताही नाही आणि नीतीही नाही. त्यामुळेच ते अशाप्रकारच्या भाषेपर्यंत घसरले आहेत. ज्यांनी प्रभू रामांच्या अस्तित्वालाच नाकारलं आणि खरंच रामाचा जन्म झाला होता का असा प्रश्न उपस्थित केला असे लोक 700 वर्षांचा कलंक मिटवून रामललांच्या मंदिराच्या निर्मितीचं काम सुरू केलं त्यांना रावणाची उपमा देत आहेत" असं म्हणत फडणवीसांनी जोरदार टीका केली आहे. 

"रावणाचे सहकारी कोण आहेत?"

"मला विचारायचं आहे की, रावणाचे सहकारी कोण आहेत? जे रामललांचं अस्तित्व नाकारतात ते रावणाचे साथी आहेत की, अयोध्येत भव्य राम मंदिराची निर्मिती करणारे मोदी?" असा प्रश्न देवेंद्र फडणवीसांनी विचारला. तसेच मोदींना रावण म्हणण्याचा दृष्टपणा काँग्रेसच्या अध्यक्षांनी केला असं म्हणत यावर केवळ आम्ही नाही, तर संपूर्ण देश त्यांचा निषेध करत आहे, असंही म्हटलं. "जेव्हा जेव्हा काँग्रेस आणि विरोधी पक्षांनी मोदींना शिव्या दिल्या आहेत तेव्हा तेव्हा गुजरात आणि देशाच्या जनतेने मतांच्या माध्यमातून त्या नेत्यांना उत्तर दिलं आहे. तसेच मागच्या पेक्षा अधिक मतं देत मोदींसोबत असल्याचं सांगितलं. तसेच अशा लोकांना त्यांची लायकी दाखवली आहे. माफ करा मी लायकी हा शब्द वापरला, पण कधी कधी हा शब्द वापरावा लागतो. गुजरातची जनता त्यांना माफ करणार नाही काँग्रेसचा आतापर्यंतचा सर्वात वाईट पराभव या निवडणुकीत होईल आणि भाजपाचा मोठा विजय होईल" असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसNarendra Modiनरेंद्र मोदीGujarat Assembly Election 2022गुजरात विधानसभा निवडणूक 2022congressकाँग्रेस