शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवटीची भाजपाची मागणी; विरोधक आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2019 07:26 IST

सीबीआय विरुद्ध कोलकात्याचे पोलीस आयुक्त राजीवकुमार यांच्या संघर्षानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला आता काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह १४ विरोधी पक्षांच्या नेत्यांनी पाठिंबा दिला

नवी दिल्ली/कोलकाता : सीबीआय विरुद्ध कोलकात्याचे पोलीस आयुक्त राजीवकुमार यांच्या संघर्षानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला आता काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह १४ विरोधी पक्षांच्या नेत्यांनी पाठिंबा दिला असून, केंद्र सरकार सीबीआयचा राजकीय हेतूंसाठी वापर करीत आहे, असा आरोप केला आहे. जीव गेला तरी बेहत्तर, आता मागे हटणार नाही, असा इशारा ममता यांनी दिला आहे.संसदेतही या प्रकरणाचे जोरदार पडसाद उमटले आणि दोन्ही सभागृहांचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करावे लागले. लोकसभेत बोलताना पश्चिम बंगालमध्ये घटनात्मक पेचप्रसंग निर्माण झाल्याचा दावा केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी केला. त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट आणण्याची केंद्र सरकार तयारी करीत असल्याची चर्चा दिल्लीत सुरू झाली. त्यातच भाजपा नेत्यांनी ममता बॅनर्जी यांचे सरकार बरखास्त करून राज्यात राष्ट्रपती राजवट आणण्याची मागणी सुरू केली. पश्चिम बंगालचे राज्यपाल केशरीनाथ त्रिपाठी यांनी राज्यातील परिस्थितीबाबत आपला अहवाल केंद्राला सादर केला आहे. अर्थात त्यातत्यांनी काय म्हटले आहे, हे स्पष्ट झालेले नाही. मात्र केंद्रीय गृहमंत्र्यांप्रमाणेच राज्यपालांनीही घटनात्मक पेचप्रसंगाला उल्लेख अहवालात केल्याचे बोलले जात आहे. पश्चिम बंगालमध्ये आणीबाणीसदृश्य परिस्थिती नरेंद्र मोदींनी नव्हे, तर ममता बॅनर्जी यांनी निर्माण केली आहे. सीबीआयपासून स्वत:ला वाचविण्याची धडपड ममतांनी चालवली आहे. या राज्यामध्ये राज्यघटनेची पायम्मली झाली आहे, असा आरोप त्यांनी केला. केंद्रीय राज्यमंत्री बाबुल सुप्रियो यांनी तर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची थेट मागणी केली.सीबीआयने सोमवारी सकाळी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आणि शारदा आणि रोझ व्हॅली चिट फंड घोटाळ््याच्या तपासात कोलकत्याचे पोलीस आयुक्त राजीव कुमार यांचा जाबजबाब घेण्यावरून रविवारी घडलेल्या अभूतपूर्व घटनाक्रमाची माहिती देत आयुक्त कुमार यांना तात्काळ तपासाठी हजर होण्याचे आदेश द्यावे, अशी विनंती न्यायालयाला केली. मात्र त्यावर लगेच सुनावणी घेण्यास नकार देताना, ती मंगळवारी होईल, असे न्यायालयाने स्पष्ट केले.राज्यभर आंदोलनकोलकात्यात झालेल्या प्रकारानंतर तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारविरोधात राज्यभर आंदोलन सुरू केले. अनेक ठिकाणी रेल्वे व रस्ते बंद करण्यात आले आणि बऱ्याच ठिकाणी केंद्र सरकारच्या प्रतिमांचेही दहन करण्यात आले. त्यामुळे राज्यात बºयाच भागांत बंदसदृश्य वातावरण होते.पुरावे नष्ट केल्याचा उल्लेखच नाही : कोर्ट‘सीबीआय’च्या तपासी पथकाला देण्यात आलेल्या वागणूकीचे इलेक्ट्रॉनिक पुरावे नष्ट केले जाण्याची भीती सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सर्वोच्च न्यायालयात व्यक्त केली. पोलीस आयुक्तहीपुरावे नष्ट करण्याची शक्यता आहे, असे ते म्हणाले. त्यावर सरन्यायाधीश रंजन गोगोई म्हणाले की, सीबीआयच्या अर्जात पुरावे नष्ट केल्याचा उल्लेख नाही. पुरावे नष्ट करण्याचा पोलीस आयुक्तांचा इरादा आहे किंवा होता असे दुरान्वयानेही दाखविणारा एक जरी पुरावा तुम्ही सादर केलात तर आम्ही त्यांना पश्चात्ताप होईल, अशी अद्दल घडवू.हुकूमशाही प्रवृत्तीचापराभव करू - राहुलराहुल गांधी यांनी ममता बॅनर्जी यांना फोन करून पाठिंबा दर्शविला. सर्व विरोधी पक्ष मिळून हुकूमशाही प्रवृत्तीच्या मोदी सरकारचा नक्की पराभव करू, असेही त्यांनी ममता यांना सांगितले.यांनी दिला पाठिंबादिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी, बसपाच्या प्रमुख मायावती, सपाचे प्रमुख अखिलेश यादव, राजदचे नेते तेजस्वी यादव, माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला, मेहबूबा मुफ्ती, लालूप्रसाद यादव, एम.के. स्टॅलिन, तेजस्वी यादव, यशवंत सिन्हा, हेमंत सोरेन, शरद यादव, मनसेचे प्रमुख राज ठाकरे, जिग्नेश मेवाणी यांनीही ममता बॅनर्जी यांच्या धरण्याला पाठिंबा दर्शविला.

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीBJPभाजपा