नरेंद्र मोदींच्या वाराणशीतच भाजपाला पराभवाचा हादरा

By Admin | Updated: January 9, 2016 04:12 IST2016-01-09T04:12:28+5:302016-01-09T04:12:28+5:30

उत्तर प्रदेशातील जिल्हा परिषद, पंचायत सभापतींच्या निवडणुकीत समाजवादी पार्टीने भाजपाचा पुरता सफाया केला. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणशी मतदारसंघातही भाजपाला पराभवाचा हादरा

BJP defeats Narendra Modi's Varanasi only | नरेंद्र मोदींच्या वाराणशीतच भाजपाला पराभवाचा हादरा

नरेंद्र मोदींच्या वाराणशीतच भाजपाला पराभवाचा हादरा

लखनौ : उत्तर प्रदेशातील जिल्हा परिषद, पंचायत सभापतींच्या निवडणुकीत समाजवादी पार्टीने भाजपाचा पुरता सफाया केला. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणशी मतदारसंघातही भाजपाला पराभवाचा हादरा देत मुलायमसिंग यादव यांच्या पक्षाने पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीची दमदार तयारी चालविली असल्याचे संकेत दिले आहेत.
उत्तर प्रदेश भाजपाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत वाजपेयी
यांच्या मीरत मतदारसंघातही भाजपाला धक्कादायक पराभव पत्करावा लागला. या निवडणुकीत ७४पैकी ६० जागा पटकावत समाजवादी पक्षाने पकड घट्ट असल्याचे दाखवून दिले. या पक्षाने ३९पैकी ३६ जागा अविरोध पटकावल्या. भाजपाला केवळ ७ जागा मिळवता आल्या असून, प. उत्तर प्रदेशातील ५ जागांचा त्यात समावेश आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: BJP defeats Narendra Modi's Varanasi only