शहरं
Join us  
Trending Stories
1
APMC निवडणूक घ्या, प्रशासक नियुक्ती रद्द; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले
2
नवी मुंबईत ‘गाेल्डन मेट्रो’चे पुढचे पाऊल; डीपीआरचे पुनरावलोकन, ३० मिनिटांत गाठा विमानतळे
3
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
4
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
5
कुजबुज! आता पवार कुटुंब एकत्र दिसणार का?; ‘झालं गेलं गंगेला मिळू द्या, महाराष्ट्र हितासाठी...'
6
मंत्रिमंडळाऐवजी पायाभूत समितीला अंतिम अधिकार; फडणवीस सरकारनं हा निर्णय का घेतला?
7
मुंबईत दुहेरी हत्याकांड! २३ वर्षीय तरुणाने वडील, आजोबांची केली हत्या; काकांवरही केला चाकू हल्ला
8
विरोधात लिहिले की पत्रकारांचा छळ सुरू होतो; हायकाेर्टानं नोंदवलं महत्त्वपूर्ण निरीक्षण
9
बोलघेवड्याचा बोलाचा भात...! रशिया-युक्रेन युद्धाला डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानानं नवं वळण?
10
मायबाप सरकार, फक्त कागदावर नको, बांधांवर या! निकष बाजूला सारून मदतीचा हात पुढे केला पाहिजे
11
विमानाच्या चाकातील 'त्याच्या' प्रवासाचा जीवघेणा थरार! हृदयाचा थरकाप उडवणारी एक कहाणी
12
मैदानावर क्रिकेट खेळा, खुन्नस कसली काढता?; राजकीय ‘आकां’ना आपण जाब विचारला पाहिजे
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

अब की बार 250च्या पार; भाजपाला अनुकूल सट्टा बाजार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2019 13:23 IST

सत्ता बाजारात भाजपाची हवा; काँग्रेसला धक्का बसण्याचा अंदाज

जैसलमेर: सध्या देशातील सर्वच पक्षांनी निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार, याची आकडेवारी 23 मे रोजी जाहीर होणाऱ्या निकालानंतर पुढे येईल. मात्र सध्या सट्टा बाजारानं भाजपाला कौल दिला आहे. येत्या निवडणुकीत भाजपाला 250 पेक्षा अधिक जागा मिळतील, असा अंदाज सट्टा बाजाराकडून वर्तवण्यात येत आहे. भाजपाच्या नेतृत्त्वाखालील एनडीएला 300 हून अधिक जागांवर विजय मिळेल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. राजस्थानच्या जैसलमेरमधील सट्टा बाजारानुसार काँग्रेसला देशात आणि राज्यातही फारसं यश मिळणार नाही. काँग्रेसला 100 जागा मिळतील, असा अंदाज आधी व्यक्त करण्यात आला होता. मात्र आता काँग्रेसला केवळ 72 ते 74 जागा मिळण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे गेल्याच वर्षी विधानसभा निवडणूक जिंकणाऱ्या काँग्रेसला राज्यात धक्का बसेल, असा अंदाज आहे. राजस्थानातून एकूण 25 खासदार लोकसभेत जातात. यातील 18 ते 20 जागांवर भाजपाला यश मिळू शकतं. गेल्याच महिन्यात पुलवामात दहशतवादी हल्ला झाला. यानंतर हवाई दलानं बालाकोटमध्ये एअर स्ट्राइक केला. हवाई दलाच्या या धडाकेबाज कारवाईचा फायदा सत्ताधारी पक्षाला होऊ शकतो. या कारवाईमुळे मोदी सरकारला अनुकूल वातावरण निर्माण झालं. पंतप्रधान मोदींचं नेतृत्व अतिशय सक्षम असल्याची भावना मतदारांमध्ये निर्माण झाल्याचं सट्टा बाजारातील बुकी सांगतात. एअर स्ट्राइकच्या आधी सट्टा बाजारातील बुकींनी भाजपाला 200 हून अधिक, तर एनडीएला 280च्या आसपास जागा मिळतील, असा अंदाज व्यक्त केला होता.  

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकBJPभाजपाcongressकाँग्रेसindian air forceभारतीय हवाई दलIndian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईक