शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

भाजपानं 'या' राज्यात इतिहास रचला, पहिल्यांदाच पक्षाचा महापौर बनला; विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठा संकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 15:40 IST

खरे तर, गेल्या ४५ वर्षांपासून या महापालिकेवर असलेल्या डाव्यांच्या (CPM) वर्चस्वाला जोरदार धक्का देत अथवा सुरुंग लावत भाजपने हा ऐतिहासिक विजय मिळवला आहे.

केरळच्याराजकारणात भाजपने शुक्रवारी (२६ डिसेंबर २०२५) एक नवा इतिहास रचला. भाजपचे ज्येष्ठ नेते व्ही. व्ही. राजेश यांची तिरुवनंतपुरम महानगरपालिकेच्या महापौरपदी निवड झाली असून, केरळमध्ये भाजपचा महापौर होण्याची ही पहिलीच वेळ आहे. खरे तर, गेल्या ४५ वर्षांपासून या महापालिकेवर असलेल्या डाव्यांच्या (CPM) वर्चस्वाला जोरदार धक्का देत अथवा सुरुंग लावत भाजपने हा ऐतिहासिक विजय मिळवला आहे.

असं आहे राजकीय गणित - एकूण १०१ सदस्य असलेल्या या सभागृहात ४५ वर्षीय राजेश यांना ५१ मते मिळाली आहेत. एका अपक्ष नगरसेवकाने दिलेल्या पाठिंब्याने भाजपने बहुमताचा आकडा गाठला. तर विरोधात मैदानात असलेल्या सीपीआयएमच्या आर. पी. शिवाजी यांना २९, तर काँग्रेसप्रणित यूडीएफच्या के. एस. सबरीनाथन यांना १९ मते मिळाली. महत्वाचे म्हणजे, या महापालिका निवडणुकीत भाजपने स्वबळावर ५० जागा जिंकत आपली शक्ती दाखवून दिली आहे.

पदभार स्वीकारल्यानंतर राजेश यांनी शहराच्या सर्वांगीण विकासाचा निर्धार व्यक्त करत, "आम्ही सर्वांना सोबत घेऊन पुढे जाऊ आणि सर्व १०१ प्रभागांचा समान विकास करून तिरुवनंतपुरमला एका विकसित शहरात रूपांतरित करू," असे म्हटले आहे. केरळ भाजपचे प्रदेशाध्यक्ष राजीव चंद्रशेखर यांनी या विजयाचे स्वागत करताना तिरुवनंतपुरमला देशातील पहिल्या तीन शहरांत स्थान मिळवून देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

विधानसभा निवडणुकीत भाजपाला गेल्या अनेक निवडणुकांपासून संघर्ष करावा लागत आहे. भाजपला  २०१६ मध्ये केवळ एक जागा मिळाली होती. ओ राजगोपाल यांनी २०१६ मध्ये नेमोम मतदारसंघातून विजय मिळवला होता. यानंतर, खासदार अभिनेता सुरेश गोपी यांनी २०२४ मध्ये त्रिशूरमधून विजय मिळवला होता. आता राज्याच्या राजधानीत सत्ता काबीज करणे हे भाजपसाठी केरळमधील शहरी राजकारणाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे मानले जात आहे. महत्वाचे म्हणजे, पुढील काही महिन्यांतच केरळमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत, त्या पार्श्वभूमीवर हा विजय अत्यंत महत्वाचा मानला जात आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : BJP Makes History in Kerala, Wins First Mayor Election

Web Summary : BJP's V. V. Rajesh elected Thiruvananthapuram Mayor, a first for the party in Kerala. Overcoming CPM's dominance, BJP secured 50 seats, signaling a significant win before upcoming state elections. The party aims for comprehensive urban development.
टॅग्स :KeralaकेरळBJPभाजपाPoliticsराजकारण