शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

४५ वर्षाचा गड कोसळला, भाजपानं रचला इतिहास; १ मत फिरवलं अन् 'या' महापालिकेत बसवला महापौर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 17:05 IST

शुक्रवारी सकाळी महापालिकेत महापौरपदाची निवड पार पडली. त्या भाजपाच्या उमेदवाराला ५१ मते मिळाली

दक्षिणेकडील केरळ राज्यात भाजपाने इतिहास रचला आहे. याठिकाणी पहिल्यांदाच भाजपाचा महापौर बनला आहे. भाजपाचे वरिष्ठ नेते वी.वी राजेश हे केरळची राजधानी तिरुवनंतपुरम महानगरपालिकेतील पहिले भाजपा महापौर बनले आहेत. दक्षिणेच्या राजकीय इतिहासात ही घटना महत्त्वाची मानली जाते कारण आतापर्यंत या राज्यात भाजपाला कधी यश मिळाले नव्हते. महापौरपद घेताच वी.वी राजेश यांनी सगळ्यांना सोबत घेऊन सर्व वार्डाचा विकास करू आणि तिरुवनंतपुरमला एक विकसित शहर बनवू असा विश्वास व्यक्त केला.

शुक्रवारी सकाळी महापालिकेत महापौरपदाची निवड पार पडली. त्या भाजपाच्या उमेदवाराला ५१ मते मिळाली. त्यांना अपक्ष नगरसेवक एम राधाकृष्णन यांचे मत मिळाले तर दुसऱ्या अपक्षाने मतदानात भाग घेतला नाही. १०० सदस्यांच्या उपस्थितीत भाजपा उमेदवार राजेश यांना ५१ मते मिळाली तर त्यांच्याविरोधात उभे असणारे सीपीआयएमचे आर.पी शिवाजी यांना २९ आणि काँग्रेसच्या नेतृत्वातील UDF चे उमेदवार के.एस सबरिनाथन यांना एकूण १९ मते मिळाली. भाजपाने डिसेंबरच्या सुरुवातीला तिरुवनंतपुरम महानगरपालिकेच्या निवडणुकीत ५० जागा जिंकल्या होत्या. 

केरळात भाजपाच्या विजयाची सुरुवात

राजेश महापौरपदी अशा वेळी विराजमान झालेत जेव्हा पुढील ६ महिन्यात राज्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपाला दीर्घ काळापासून संघर्ष करावा लागत आहे. याआधी पक्षाला केरळमध्ये कधी विजय मिळाला नाही. भाजपा २०१६ मध्ये फक्त एका जागेवर जिंकली होती. ओ राजगोपाल २०१६ मध्ये नेमोम मतदारसंघातून विजयी झाले. त्यानंतर २०२४ मध्ये पक्षाचा एक खासदार अभिनेता सुरेश गोपी यांनी त्रिशूरमधून विजय मिळवला. आता वी.वी राजेश यांच्या महापौर बनण्याने केरळच्या शहरी राजकारणात भाजपाच्या विजयाची सुरुवात झाल्याचे संकेत मिळत आहेत.

४५ वर्षाचा गड कोसळला

भाजपाचा हा विजय यासाठीही खास आहे कारण मागील ४५ वर्षापासून तिरुवनंतपुरम महापालिकेवर सीपीएमचा कब्जा होता. भाजपाने याठिकाणी सत्तापालट करून सीपीएमच्या या गडाला भगदाड पाडले आहे त्याशिवाय दक्षिणेकडील राज्यात भाजपाची पकड आणखी मजबूत केली आहे. सीपीएम आणि काँग्रेसने मिळून शहराला मागे ढकलले. महापालिकेला भ्रष्टाचाराचा अड्डा बनवले होते. मागील अनेक वर्ष ड्रेनेज, पाणी आणि कचरा नियोजन यासारख्या सुविधाही लोकांना दिल्या नाहीत असा आरोप भाजपा प्रदेशाध्यक्ष राजीव चंद्रशेखर यांनी केला. आज आमच्या कामाची  सुरुवात झाली आहे. तिरुवनंतपुरमला देशातील प्रमुख ३ शहरांपैकी एक बनवणे आमचे काम आहे असं भाजपा महापौरांनी सांगितले.  

English
हिंदी सारांश
Web Title : BJP Breaks 45-Year Hold, Wins Thiruvananthapuram Mayor Election

Web Summary : In a historic win, the BJP secured its first mayoral position in Kerala's Thiruvananthapuram, ending CPM's 45-year reign. V.V. Rajesh aims to develop the city, marking a potential shift in Kerala's political landscape ahead of upcoming elections.
टॅग्स :BJPभाजपाKeralaकेरळ