‘यूपीत भाजपाला गाय मम्मी, ईशान्य भारतात मात्र यम्मी’

By Admin | Updated: April 2, 2017 00:56 IST2017-04-02T00:56:06+5:302017-04-02T00:56:06+5:30

उत्तर प्रदेशात कत्तलखान्यांवर कारवाई करण्याच्या तेथील भाजपा सरकारवर एमआयएमचे नेते व खा. असाउद्दिन ओवेसी यांनी जोरदार टीका केली आहे

'BJP is cow mummy in UP; Yummy in northeast India' | ‘यूपीत भाजपाला गाय मम्मी, ईशान्य भारतात मात्र यम्मी’

‘यूपीत भाजपाला गाय मम्मी, ईशान्य भारतात मात्र यम्मी’

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशात कत्तलखान्यांवर कारवाई करण्याच्या तेथील भाजपा सरकारवर एमआयएमचे नेते व खा. असाउद्दिन ओवेसी यांनी जोरदार टीका केली आहे. योगी आदित्यनाथ यांच्या भाजपा सरकारसाठी उत्तर प्रदेशमध्ये गाय मम्मी (आई) आहे. पण तीच गाय ईशान्य भारतात त्यांच्यासाठी यम्मी (चविष्ट खाद्यप्रकार) आहे, असा टोला ओवेसी यांनी शनिवारी लगावला आहे.
ईशान्येच्या मेघालय, मिझोरम आणि नागालँड या तीन राज्यांमध्ये या वर्षीच्या अखेरीस विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. ही तिन्ही राज्ये ताब्यात यावीत, यासाठी भाजपाने जोरदार तयारी सुरू केली आहे. त्यामुळे बीफबंदीची चर्चा सर्वत्र जोरात सुरू असताना ईशान्येकडील राज्यांमध्ये आम्ही
सत्तेत आल्यावर बीफबंदी लागू करणार नाही, असे
भाजपाच्या नेतृत्वाने नुकतेच जाहीर केले आहे.
भाजपाच्या या दुटप्पी धोरणावर टीका करताना असाउद्दिन ओवेसी यांनी वरील वक्तव्य केले. कत्तलखान्यांवरील कारवाईमुळे उत्तर प्रदेशात बेरोजगारीचे मोठे संकट उभे राहिले असल्याचा आरोपही त्यांनी केला. (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: 'BJP is cow mummy in UP; Yummy in northeast India'