शहरं
Join us  
Trending Stories
1
"तेच रडणे, तीच मळमळ, त्याच उलट्या, त्याच फुशारक्या...", भाजपाने उद्धव ठाकरेंना डिवचलं
2
तेव्हा गरजेपेक्षा जास्त कर्मचारी भरले, आता त्यांना बेरोजगार करणार; ॲमेझॉनमध्ये ३०,००० नोकऱ्या धोक्यात
3
"महाराष्ट्रात भाजप कोणाच्याही कुबड्यांवर चालत नाही; सत्तेमुळे तुम्ही समाधानी असाल, पण मी नाही": शाह
4
आजचे राशीभविष्य, २८ ऑक्टोबर २०२५: ‘मौनं सर्वार्थ साधनम्’, येणी वसूल होतील; सरकारी लाभ
5
चिनी हँडलर, टेलिग्राम ट्रॅप, लाखोंची लूट... ४७ लाखांच्या फसवणुकीचा पर्दाफाश, तिघांना अटक
6
तुमचे अधिकारी वृत्तपत्र वाचत नाहीत का? देशाची प्रतिमा मलिन होतेय; भटक्या कुत्र्यांवरून भडकले कोर्ट
7
१२ राज्यांमध्ये होणार मतदार याद्यांची पडताळणी; SIR दुसरा टप्पा ४ नोव्हेंबरपासून, महाराष्ट्राचा समावेश नाही
8
मतदाराचे आणि त्याच्या वडिलाचे आडनाव वेगवेगळे, २० हजार मतदारांची नावे संशयास्पद: आदित्य ठाकरे
9
शाळेची नव्हे, धोक्याची घंटा! सरकारी अनास्था आणि 'विनाअनुदानित' इंग्रजी शाळांचा वाढता बाजार
10
सरन्यायाधीश बूटफेक प्रकरण: वकिलावर कारवाई करणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्टीकरण
11
तातडीने सुनावणीस नकार, पण दोन मागण्या मान्य; मराठा-ओबीसी आरक्षण वादात ओबीसी संघटनेला कोर्टाचा दिलासा
12
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
13
तोटा झाल्याची बनावट कागदपत्रे; कुर्ल्यातील कंपनीने कॅनरा बँकेला तब्बल ११ कोटींना गंडवले
14
शिवडीतील दागिने लुटीचा सुरक्षारक्षक निघाला सूत्रधार; एकाच घरात राहत होते सर्व आरोपी
15
राम जन्मभूमी मंदिराचे काम पूर्ण, २५ नोव्हेंबरला भव्य सोहळा, ६ ते ८ हजार निमंत्रित येणार
16
जामीन अर्जाविरोधात अर्ज करण्याचा प्रश्नच येत नाही; खालिद, शार्जिलवरून कोर्टाने दिल्ली पोलिसांना फटकारले
17
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
18
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
19
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
20
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता

‘आरबीआयला भाजपा आपला विभागच समजते’ - पी. चिदंबरम

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2018 04:27 IST

भाजपाचे सरकार रिझर्व्ह बँकेला देशाची मध्यवर्ती बँक आणि स्वायत्त संस्था न मानता आपला एक विभागच समजते व त्याचप्रमाणे तिचा उपयोग व्हावा, असे त्याला वाटते, असे स्पष्ट मत माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी व्यक्त केले.

भाजपाचे सरकार रिझर्व्ह बँकेला देशाची मध्यवर्ती बँक आणि स्वायत्त संस्था न मानता आपला एक विभागच समजते व त्याचप्रमाणे तिचा उपयोग व्हावा, असे त्याला वाटते, असे स्पष्ट मत माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी व्यक्त केले.भाजपाला जे हवे होते ते न केल्यामुळे ऊर्जित पटेल यांना रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदाचा राजीनामा द्यावा लागला. नूतन गव्हर्नर शक्तिकांत दास हे आपण अर्थ मंत्रालयातील माजी सचिव आहोत हे विसरून काम करतील व रिझर्व्ह बँकेची प्रतिष्ठा टिकवतील, अशी आशा व्यक्त करून ते म्हणाले, सार्वजनिक बँकांमध्ये झालेले कर्ज घोटाळे व वसूल न होणाऱ्या कर्जाबद्दल काँग्रेसवर सतत टीका होते. एक घोटाळा यशवंत सिन्हा असताना व दुसरा संयुक्त पुरोगामी आघाडीचे सरकार असताना झाला. त्यावेळी जागतिक परिस्थिती चांगली होती. रुपयाचा दर व बाजारही योग्य होता. यूपीएच्या काळातील वसूल न झालेल्या कर्जाबद्दल बोलायचे तर तेव्हा जागतिक मंदी होती हे लक्षात ठेवावे लागेल. बाजार प्रतिकूल होता. कर्ज फेडण्यासाठी उद्योगांकडे पैसे नव्हते. जर कुणी ठरवून कर्ज फेडत नसेल तर तो गुन्हा आहे. यूपीए आणि यशवंत सिन्हा यांची कारकिर्द योग्यरीत्या समजून घेतली गेली तर भाजपाचा खोटारडेपणा समोर येईल. भाजपा सिन्हा यांच्या कारकिर्दीतील एनपीएबद्दल काहीच का बोलत नाही?जम्मू आणि काश्मीरमधील परिस्थितीवर चिदंबरम म्हणाले, खोºयातील परिस्थितीवर दिलीप पाडगावकर यांच्या अध्यक्षतेखालील समितीचा अहवाल संसदेत सादर करू न शकल्याबद्दल मला खेद होतोय. काश्मीर प्रश्नाचे उत्तर हे संवाद व चर्चाच आहे. हे धोरण आम्ही अवलंबले होते. भाजपा सरकारने शक्तीच्या प्रयोगांनी काश्मीर प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला. तो योग्य नाही. काश्मीरचा प्रश्न जेव्हा अस्फा, विशेष कायद्यात दुरुस्त्या केल्या जातील तेव्हाच सुटू शकेल हे मी पुन्हा पुन्हा सांगेन. माझा पक्षही माझ्या विचारांशी पूर्णपणे सहमत नसेल हेही मला माहिती आहे. पण मी माझ्या विचारांवर ठाम आहे, असे ते म्हणाले.तीन राज्यांतील काँग्रेसच्या विजयाचे श्रेय नोटाबंदीमुळे लोकांमध्ये आलेल्या नैराशाला आहे. भाजपा खोटे बोलला हे त्यांना समजले. नोटाबंदीचे परिणाम हे टप्प्याटप्प्याने दिसतील हे मी त्या निर्णयानंतर अवघ्या सात तासांत सांगितले होते. त्यानंतर लगेचच उत्तर प्रदेशात निवडणुका झाल्या व त्याचमुळे त्याचा परिणाम तेव्हा दिसला नाही. त्याचा प्रचार असा केला गेला की, लोकांवर नोटाबंदीचा काही परिणाम झाला नाही. आर्थिक बाबतीत परिणाम नंतर होतात हे समजून घेतले पाहिजे. नोटांबदीनंतर विदेशी गुंतवणूकदारांनी भारतात गुंतवणूक बंद केली व भारतीय गुंतवणूकदारांनी विदेशात पैसे गुंतवायला सुरुवात केली. यामुळे नोकºया कमी निर्माण झाल्या. आता तो परिणाम दिसत आहे.काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वात छान उत्साह समोर आला आहे व आम्ही जिंकलो. ही वेळ भाजपासाठी आत्मचिंतनाची आहे असेही ते म्हणाले.या निवडणुकीत राहुल गांधी यांना त्यांची जात का सांगावीशी वाटली, या प्रश्नावर चिदंबरम म्हणाले, तो मुद्दा प्रसारमाध्यमांनी निवडणुकीत बनवला. त्यांनी जात सांगितली नाही. पुरोहिताने त्यांना विचारल्यावर तो मुद्दा समोर आला. लोकसभा निवडणुकीनंतर गांधी पंतप्रधानपदाचे दावेदार असतील का यावर चिदंबरम म्हणाले, ते तर निकालानंतर ठरेल व वेगवेगळ््या पक्षांवर ते अवलंबून असेल.मी नेहमी हे सांगत आलो आहे की, १०-१२ राज्यांत प्रादेशिक पक्ष चांगली कामगिरी करणार असतील तर किमान १० राज्यांत काँग्रेसची कामगिरी चांगली असेल. बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दल, उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष व बहुजन समाज पक्ष, तामिळनाडूत द्रमुक चांगली कामगिरी करतील. आम्हाला याच आधारावर पुढे जायचे आहे. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी पुढे असतील. निकालानंतर पंतप्रधानपदावर चर्चा होईल. जो मोठा पक्ष असेल व ज्याची कामगिरी चांगली असेल त्यावर चर्चा होईल. सगळे मित्र पक्ष मिळून चर्चा होईल व त्यानंतर निर्णय.अयोध्येतील राममंदिरासाठी भाजपा अध्यादेश किंवा कायदा करणार असेल तरी काँग्रेसला विजयाची खात्री आहे का, असे विचारल्यावर चिदंबरम म्हणाले, असे सगळे अंदाज चुकले आहेत. भाजपाला निवडणुकीच्या वेळेसच रामाची आठवण येते. काहीही करून निवडणुका जिंकायच्या हाच भाजपाचा हेतू आहे. परंतु, यावेळी लोक स्वत:चे वाईट दिवस येऊ देणार नाहीत.च्शब्दांकन : संतोष ठाकूरमुलाखत : बरखा दत्त

टॅग्स :P. Chidambaramपी. चिदंबरमIndiaभारतBJPभाजपा