शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

बुलेट ट्रेनवरून भाजपा-काँग्रेसमध्ये गरमागरमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2018 03:44 IST

लोकसभेत वादळी चर्चा; प्रकल्पाचा खर्च अवाजवी असल्याचा विरोधकांचा आरोप

नवी दिल्ली : मुंबई-अहमदाबादमधील बुलेट ट्रेन प्रकल्पावरुन भाजप व विरोधी पक्षसदस्यांमध्ये बुधवारी लोकसभेत गरमागरमी झाली. या प्रकल्पाचा खर्च अवाजवी असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी घेतला तर मागील सरकारनेच आपल्या संकुचित राजकीय लाभासाठी हा प्रकल्प मंजूर केला असा आरोप भाजपने केला.१.१० लाख कोटी रुपये खर्चाच्या बुलेट ट्रेन प्रकल्पाबद्दल प्रश्नोत्तराच्या तासात बोलताना काँग्रेसचे नेते मल्लिकार्जून खरगे यांनी सांगितले की, इतका प्रचंड पैैसा या प्रकल्पावर खर्च करण्यापेक्षा त्याच पैशातून देशातील हजारो किलोमीटरचे रेल्वेमार्ग दुहेरी करता येतील किंवा नवी रेल्वेमार्ग बांधता येतील.काँग्रेसप्रणित मागील सरकारने राजकीय लाभ मिळविण्यासाठी हा प्रकल्प मंजूर केला असा आरोप करुन रेल्वेमंत्री पियुष गोयल म्हणाले की, रेल्वेच्या आर्थिक स्थितीकडे कानाडोळा करुन तत्कालीन रेल्वेमंत्र्यांनी आपल्या मतदारसंघांसाठी काही रेल्वे प्रकल्पही मंजूर करुन घेतले. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी जपानने पन्नास वर्षांसाठी ०.१ टक्के व्याजदराने कर्ज दिले आहे. कर्ज दिल्यानंतर पहिलीपंधरा वर्षे त्याची परतफेड केली नाही तरी चालणार आहे. तसे यासंदर्भातील करारात नमूद करण्यात आले आहे. ४० वर्षांपूर्वी काँग्रेस सरकारने जे रेल्वे प्रकल्प संमत केले होते तेही त्यांना पूर्ण करता आले नाहीत अशी त्यांची अकार्यक्षम राजवट होती.पीयूष गोयल यांच्या वक्तव्याचा केला निषेधगोयल यांच्या वक्तव्याचा काँग्रेसच्या खासदारांनी जोरदार निषेध केला. त्याला त्याच पद्धतीने भाजपा खासदारांनीही सभागृहात उत्तर दिले.या गदारोळामुळे बुलेट ट्रेन प्रकल्पासंदर्भातील प्रश्नाची चर्चा तिथेच थांबवून लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी पुढचा प्रश्न घेतला.पीयूष गोयल यांनी असेही सांगितले की, मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी गुजरात, महाराष्ट्र, दादरा-नगरहवेली येथील १२ जिल्ह्यांतील १,४८४ हेक्टर जमीन संपादित करण्याचे काम सुरू आहे. हा प्रकल्प डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण करण्यात येईल.

टॅग्स :Bullet Trainबुलेट ट्रेनcongressकाँग्रेसBJPभाजपाLoksabhaलोकसभा