शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
4
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
5
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
6
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
7
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
8
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
9
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
10
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
11
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
12
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
13
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? हल्ल्याच्या भीतीने शेअर बाजार धडाम; काय आहे परिस्थिती?
14
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
15
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
16
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
17
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
18
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
19
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
20
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...

जेपी नड्डा यांच्या ताफ्यावरील हल्लाप्रकरणी 7 जणांना अटक, 3 एफआयआरची नोंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2020 17:08 IST

BJP JP Nadda : जेपी नड्डा यांच्या वाहन ताफ्याला झेड सुरक्षेशिवाय बंगाल पोलिसांनी अतिरिक्त सुरक्षा प्रदान केली होती.

नवी दिल्ली - पश्चिम बंगालमध्येभाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या ताफ्यावर झालेल्या दगडफेकीच्या घटनेला केंद्र सरकारने गंभीरपणे घेतले असून राज्यपाल जगदीप धनखड़ यांच्याकडून अहवाल मागविला होता. धनखड यांचा अहवाल मिळताच केंद्राने तातडीने बंगालचे डीजीपी आणि मुख्य सचिवांना दिल्लीला बोलवून घेतले असून पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याचे संकेत राज्यपालांनी दिले आहेत. याच दरम्यान नड्डा यांच्या वाहन ताफ्यावर झालेल्या हल्याप्रकरणी आता कारवाई सुरू झाली आहे. 

पश्चिम बंगाल पोलिसांनी या प्रकरणी आतापर्यंत सात जणांना अटक केली असून तीन एफआयआर नोंदवले गेले आहेत. तसेच पश्चिम बंगाल पोलिसांनी दगडफेकी प्रकरणी देखील अज्ञात लोकांविरोधात दोन एफआयआर नोंदवले आहेत. याशिवाय अन्य एक एफआयआर भाजपा नेता राकेश सिंह यांच्याविरोधातही नोंदवला गेला आहे. ज्यांच्यावर जमावाला भडकवण्याचा आरोप करण्यात आला आहे.

पश्चिम बंगाल पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जेपी नड्डा यांच्या वाहन ताफ्याला झेड सुरक्षेशिवाय बंगाल पोलिसांनी अतिरिक्त सुरक्षा प्रदान केली होती. नड्डा यांचा ताफा जाणार त्या मार्गावर आणि कार्यक्रमस्थळी चार अतिरिक्त पोलीस अधीक्षक, 8 पोलीस उपअधीक्षक, 8 पोलीस निरीक्षक, 30 पोलीस अधिकारी, 40 आरएएफ, 145 शिपाई, 350 सीव्हीचा बंदोबस्त होता. जेपी नड्डा यांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्याची चौकशी करण्याचे आदेश केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिले आहेत. याप्रकरणी गृहमंत्रालयाने राज्यपाल जगदीप धनखड यांच्याकडे पश्चिम बंगालची सद्यस्थिती व कायदा व सुव्यवस्थेविषयी सविस्तर अहवाल मागविला आहे.

कोलकाताजवळील दक्षिण 24 परगण्यात जेपी नड्डा यांच्यासह भाजपाचे नेते डायमंड हार्बरला जात असताना दुपारी बाराच्या वाजेच्या सुमारास त्यांच्या ताफ्यावर हल्ला करण्यात आला. टीएमसीच्या कार्यकर्त्यांनी भाजपाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या ताफ्यास थांबविण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप भाजपा प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी केला. यावेळी टीएमसी कार्यकर्त्यांनी दगडफेकही केली, असे ते म्हणाले. दरम्यान, घटनेनंतर केंद्राने हे कठोर पाऊल उचलले आहे. याप्रकरणी राज्यपालांसमवेत डीजीपी आणि मुख्य सचिवांकडूनही अहवाल मागविण्यात आला आहे, असे सुत्रांकडून समजते. 

"जेपी नड्डांच्या ताफ्यावरचा हल्ला 'बनावट'"; TMC खासदार महुआ मोईत्रांचा दावा

नड्डा यांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यावर ममता बॅनर्जी यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. यानंतर आता तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी मात्र सोशल मीडियावर नड्डांवरील हा हल्ला बनावट असल्याचा दावा केला आहे. राज्यात दाखल होणारे नेते आपापल्या उच्च दर्जाची सुरक्षा यंत्रणा सोबत घेऊन येतात. मात्र तरीही नेत्यांवर हल्ला कसा होऊ शकतो असा सवालही मोईत्रा यांनी उपस्थित केला आहे. महुआ मोईत्रा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबतच एक ट्विट केलं आहे. "महाविद्यालयांच्या BYOB (ब्रिंग युअर ओन बॉटल) बद्दल ऐकलं होतं... भाजपा नेते पश्चिम बंगालमध्ये दररोज BYOS (ब्रिंग युअर ओन सिक्युरिटी) सोबत दाखल होतात. राज्यात दौऱ्यावर येणारा भाजपाचा कोणीही नेता आपल्यासोबत येताना सीआरपीएफ, सीआयएसएफ आणि केंद्रीय दलाच्या जवानांना घेऊन येतो. लज्जास्पद 'बनावट' हल्ल्यांपासून ते तुमची सुरक्षा करू शकले नाहीत" असं महुआ मोईत्रा यांनी म्हटलं आहे. 

'उठसूठ कोणीही बंगालमध्ये येतंय, चड्डा, नड्डा फाड्डा, गड्डा आलेत'; ममता बॅनर्जींचा हल्लाबोल

ममता बॅनर्जी यांनी हे सगळं नाटक आहे. माध्यमाद्वांरे भाजपा नागरिकांना सभेपर्यंत आणू शकली नाही. यासाठीच हल्ल्याचा डाव रचला होता का? त्यांनी व्हिडीओ कसे काय तयार केले? बीएसएफ आणि सीआरपीएफची सुरक्षा असताना तुम्हाला कोणी हातही लावू शकेल का? असं ममता यांनी म्हटलं आहे. तसेच "देशाच्या गृहमंत्र्यांना काही काम नाही. उठसूठ पश्चिम बंगालमध्ये येतात. कधी कोण नेता तर कधी मंत्री येतात. आता चड्डा, नड्डा, फाड्डा, गड्डा आलेत. त्यांना राज्यात जनतेचं कुठलंही समर्थन नाही. यामुळे ते आपल्या कार्यकर्त्यांना नाटक करायला लावत आहे" असा हल्लाबोल ममता बॅनर्जी यांनी भाजपावर केला आहे. 

टॅग्स :j. p. naddaजे. पी. नड्डाBJPभाजपाwest bengalपश्चिम बंगालPoliceपोलिसArrestअटक