शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

Video : चहावाल्या, एवढं मारेन की कानातून रक्त येईल; मोदींवर टीका करताना ओवेसींची जीभ घसरली

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2018 14:20 IST

तेलंगणा विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचला आहे. राजकीय नेतेमंडळी एकमेकांवर बोचऱ्या शब्दांत निशाणा साधताना पाहायला मिळत आहेत.

ठळक मुद्देअकबरुद्दीन ओवेसींची पंतप्रधान नरेंद्र मोदींवर विखारी टीका'चहा वाल्या, आम्हाला उकसवू नका', अकबरुद्दीन ओवेसींचं वादग्रस्त विधानओवेसी बंधुंची प्रक्षोभक भाषणं

हैदराबाद - तेलंगणा विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचला आहे. राजकीय नेतेमंडळी एकमेकांवर बोचऱ्या शब्दांत निशाणा साधताना पाहायला मिळत आहेत. प्रचारादरम्यान ओवेसी बंधु भाजपा-काँग्रेसच्या नेत्यांवर विखारी टीका करत आहेत. AIMIMचे खासदार असदद्दुीन ओवेसी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यामध्ये वार-पलटवार सुरू असताना या वाक् युद्धात आता अकबरुद्दीन ओवेसी यांनीही उडी घेतली आहे. एका जनसभेला संबोधित करताना अकबरुद्दीन ओवेसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. 

हैदराबादमधील चारमिनार विधानसभा मतदारसंघातील रॅलीला संबोधित करताना अकबरुद्दीन ओवेसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. पंतप्रधान मोदींवर टीका करताना त्यांची जीभ घसरल्याचे यावेळी पाहायला मिळाले.

('हिंदुस्थान मेरे अब्बा का है, नही जाऊंगा', ओवैसींचा योगींवर पटलवार)

अकबरुद्दीन ओवेसींचे प्रक्षोभक भाषण

'चहा वाल्या, आम्हाला उकसवू नका. चहा-चहा ओरडता, लक्षात ठेवा एवढं बोलेन, एवढं मारेन की कानातून रक्त बाहेर येईल', असे वादग्रस्त विधान अकबरुद्दीन ओवेसी यांनी पंतप्रधान मोदींसंदर्भात केले आहे.   

 

योगी आदित्यनाथ यांच्यावर पलटवारअकबरुद्दीन ओवैसी म्हणाले की, ''आज आणखी एक जण आला आहे. कसे कपडे घालतो तो. एखाद्या तमाशासारखा दिसतो. नशिबानं मुख्यमंत्रीदेखील झाला आहे. म्हणे निजामाप्रमाणे ओवेसीला पळवेन. अरे तुझी लायकी काय आहे?. तुझ्यासारखे 56 आले आणि गेले. अरे ओवेसीला सोडा, त्याच्या पुढे येणाऱ्या 1000 जातीदेखील या देशात राहतील आणि तुमच्या विरोधात लढतील''.

योगी-ओवेसीमध्ये वाक् युद्ध योगी आदित्यनाथ यांनी रविवारी असदुद्दीन ओवेसींवर निशाणा साधला होता. ओवेसींनी ही योगींवर पलटवार केला आहे. हिंदुस्थान मेरे अब्बा का है, मै नही जाऊंगा, असे म्हणत योगींवर पलटवार केला. तसेच तुम्हाला तारीख तर माहिती नाही अन् इतिहासातही शून्य आहात तुम्ही, असे ओवेसी यांनी योगी आदित्यनाथ यांना म्हटले. भाजपा सत्तेत आल्यास ओवेसींना निजामाप्रमाणे हैदराबाद सोडून पळावं लागेल, असं योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं होतं. यावर ओवेसींनी पलटवार केला आहे. 

टॅग्स :Asaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीyogi adityanathयोगी आदित्यनाथNarendra Modiनरेंद्र मोदीTelangana Assembly Election 2018तेलंगणा विधानसभा निवडणूक 2018