शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

'...तर ११ फेब्रुवारीला पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राईक करू'

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2020 15:56 IST

भाजपा उमेदवार तेजिंदरसिंग पाल बग्गा यांचं विधान

नवी दिल्ली: सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात गेल्या महिन्याभरापेक्षा जास्त कालावधीपासून आग्नेय दिल्लीतल्या शाहीन बागेत आंदोलन सुरू आहे. या आंदोलनावर भाजपाच्या अनेक नेत्यांनी टीका केली आहे. आता भाजपाच्या उमेदवारानं शाहीन बागेत थेट सर्जिकल स्ट्राईक करण्याचा इशारा दिला आहे. ११ फेब्रुवारीला शाहीन बागेत सर्जिकल स्ट्राईक करण्यात येईल, असं भाजपा नेते आणि उमेदवार ताजिंदरपाल सिंग बग्गा यांनी म्हटलं आहे. सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात शाहीन बागेत मुस्लिम महिलांचं आंदोलन सुरू आहे. महिन्याभराहून जास्त कालावधीपासून या महिला आंदोलन करत आहेत. या आंदोलनावर भाजपाच्या अनेक नेत्यांनी जोरदार टीका केली आहे. तर भाजपा नागरी मुद्द्यांपासून पळ काढण्यासाठी शाहीन बागेतल्या आंदोलनाचा राजकीय वापर करत असल्याचं प्रत्युत्तर आम आदमी पार्टीकडून देण्यात आलं आहे. भाजपाचे नेते जनसभांमधून शाहीन बागेतल्या आंदोलनावर टीका करत असताना ताजिंदरपाल सिंग बग्गा यांनी आंदोलकांवर थेट कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यावर शाहीन बागेत सर्जिकल स्ट्राईक करण्यात येईल, असा इशारा बग्गा यांनी दिला आहे. शाहीन बागेतल्या आंदोलकांचं समर्थक जंतरमंतरवर भारतीय सैन्याची तुलना पाकिस्तानी सैन्याशी करत असल्याचा एक व्हिडीओ बग्गा यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. 'भारतीय सैन्य आपल्याच लोकांना मारतं, असं शाहीन बाग आंदोलनाचे समर्थक जंतरमंतरवर म्हणतात. त्यांच्याकडून भारतीय सैन्याची तुलना पाकिस्तानी लष्कराशी केली जाते. शाहीन बाग देशद्रोह्यांचा अड्डा झाली आहे. ११ तारखेला निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यावर सर्वात आधी या अड्ड्यावर सर्जिकल स्ट्राईक करण्यात येईल,' असं बग्गा यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. याआधी भाजपा नेते परवेश वर्मा यांनी शाहीन बागेतल्या आंदोलनावर भाष्य करताना वादग्रस्त विधान केलं होतं. 'शाहीनबाग हे काश्मीर झालं आहे. भाजपा सत्तेत आली नाही, तर ते तुमच्या घरात घुसतील, तुमच्या मुलीला-बहिणीला उचलून नेतील, त्यांच्यावर बलात्कार करतील आणि मारून टाकतील' असं भाजपा खासदार परवेश वर्मा म्हणाले होते. दिल्लीत भाजपा सत्तेत आल्यास, एका तासात शाहीनबाग रिकामी करू, असंदेखील वर्मा यांनी म्हटलं आहे. 

टॅग्स :delhi electionदिल्ली निवडणूकBJPभाजपाAAPआप