शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

राम रहीमला ६ वेळा पॅरोल देणाऱ्या माजी पोलीस अधिकाऱ्याचा विजय; भाजपमध्ये केला होता प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2024 08:43 IST

हरयाणा निवडणुकीच्या निकालात चरखी दादरी विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार सुनील सांगवान विजयी झाले.

BJP Sunil Sangwan :हरयाणात विधानसभा निवडणुकीत स्वबळावर लढत भाजपने बहुमत मिळवलं आहे. भाजपने काँग्रेसच्या हातात असलेला विजय हिसकावून घेतला आहे. हरयाणा विधानसभा निवडणुकीत अनेक धक्कादायक निकाल समोर आले आहेत. अशातच यावेळी ही या निवडणुकीत बाबा राम रहीमचा प्रभाव असल्याचे दिसून आलं आहे. हरयाणा विधानसभा निवडणुकीत भाजपच्या विजयी उमेदवारांमध्ये सुनील सांगवान यांचे नाव असल्याने ही चर्चा सुरु झाली आहे. चरखी दादरी येथील भाजपचे उमेदवार सुनील सांगवान हे रोहतक तुरुंगाचे अधीक्षक राहिले होते आणि त्याच का डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीमची सहा वेळा पॅरोलवर सुटका झाली होती.

हरियाणा निवडणुकीच्या निकालात भाजपचे उमेदवार सुनील सांगवान यांनी चरखी दादरी विधानसभा मतदारसंघात विजय नोंदवला.  सुनील सांगवान यांनी काँग्रेसच्या मनीषा सांगवान यांचा १,९५७ मतांनी पराभव केला. ५ सप्टेंबर रोजी भाजपच्या ६७ उमेदवारांच्या पहिल्या यादीत सांगवान यांचे नाव होते. सुनील सांगवान सध्या गुरुग्रामच्या भोंडसी कारागृहात तैनात होते आणि त्यांनी तुरुंग अधीक्षक पदावरून व्हीआरएस घेतला होता. त्यांनी सरकारला पत्र लिहून स्वेच्छा निवृत्ती घेत असल्याचे सांगितले. सांगवान हे डेरा प्रमुख गुरमीत राम रहीम ज्या तुरुंगात बंद होते त्या तुरुंगाचे अधीक्षक होते.

सुनील सांगवान हे रोहतकच्या सुनारिया कारागृहाचे माजी अधीक्षक होते, जिथे राम रहीमवर बलात्कार आणि हत्येचा आरोप ठेवण्यात आला होता. निवडणुकीपूर्वी त्यांनी पदावरून निवृत्त होऊन भाजपमध्ये प्रवेश केला. महत्त्वाची बाब म्हणजे सांगवान यांच्या कार्यकाळातच गुरमीत राम रहीमला सहा वेळा पॅरोल किंवा फर्लो मंजूर करण्यात आला होता. सुनील यांचे वडील सतपाल सांगवान हे काँग्रेसचे सदस्य होते. पण जुलैमध्ये त्यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला.

हरयाणा निवडणुकीच्या काही दिवस आधी म्हणजे २ ऑक्टोबर रोजी गुरमीत राम रहीम सिंह रोहतक तुरुंगातून बाहेर आला होता. तुरुंगात त्याच्या कथित चांगल्या वर्तनामुळे त्याची सुटका झाली. पॅरोल बोर्डाला कैद्याची स्थिती कळवणे आणि त्याची पडताळणी करणे हे जेल अधीक्षकांचे म्हणजे सुनील सांगवान यांचे काम होते. कैद्याचे वर्तन आणि इतर घटकांवर अवलंबून, कारागृह अधीक्षक पॅरोल अर्जाला मंजुरी किंवा विरोध करू शकतात. राम रहीमला गेल्या सात वर्षांत १५ वेळा पॅरोल मंजूर झाला असून त्याने २५९ दिवस तुरुंगाबाहेर काढले आहेत. विधानसभा, लोकसभा किंवा पंचायत निवडणुकीच्या वेळी त्याला पॅरोल मिळाले आहेत.

दरम्यान, राम रहीमला वारंवार पॅरोल मिळत असल्याने राज्य सरकारवर अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. शिरोमणी गुरुद्वारा व्यवस्थापन समितीने पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालयातही याचिका दाखल केली होती. ज्यावर हायकोर्टाने राम रहीमला परवानगीशिवाय पॅरोल किंवा फर्लो देऊ नये असे म्हटले होते. नंतर उच्च न्यायालयानेही पॅरोल किंवा फर्लोची जबाबदारी राज्य सरकारवर टाकली होती. 

टॅग्स :HaryanaहरयाणाBJPभाजपाBaba Ram Rahimबाबा राम रहीम