शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
5
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
6
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
7
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
8
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
9
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
10
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
11
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
12
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
13
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
14
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
15
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
16
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
17
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
18
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
19
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
20
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार

शिवसेनेचे राज्यातील मंत्री गुजरातमध्ये करतायत भाजपा उमेदवाराचा प्रचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2017 17:33 IST

केंद्रात आणि राज्यात एकत्र सत्तेत असूनही शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी गुजरातमध्ये परस्परांच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत.

ठळक मुद्देशिवसेनेचे पुरंदर येथील आमदार विजय शिवतारे 22 नोव्हेंबरला सूरतच्या चोरयासी विधानसभा मतदारसंघात भाजपा उमेदवार झंखाना पटेलच्या प्रचारासाठी गेले होते.गुजरातमध्ये भाजपा उमेदवाराच्या प्रचारासाठी थेट शिवसेनेचे मंत्री गेल्यामुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

मुंबई - केंद्रात आणि राज्यात एकत्र सत्तेत असूनही शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी गुजरातमध्ये परस्परांच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत. दोन्ही ठिकाणी सत्तेत बरोबरीचा वाटा न मिळाल्याने नाराज असलेल्या शिवसेनेने भाजपाला धक्का देण्यासाठी गुजरातमध्ये उमेदवार उभे केले आहेत. पण शिवसेनेचे राज्यातील मंत्री मात्र सूरतमध्ये जाऊन भाजपा उमेदवाराचा प्रचार करत आहेत. 

शिवसेनेचे पुरंदर येथील आमदार विजय शिवतारे 22 नोव्हेंबरला सूरतच्या चोरयासी विधानसभा मतदारसंघात भाजपा उमेदवार झंखाना पटेलच्या प्रचारासाठी गेले होते. झंखाना भाजपाचे दिवंगत आमदार राजा पटेल यांची मुलगी आहे. विजय शिवतारे राज्याचे जलसंवर्धन राज्यमंत्री आहेत. झंखानाच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या सभेमध्ये मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलारही उपस्थित होते. गुजरातमध्ये भाजपा उमेदवाराच्या प्रचारासाठी थेट शिवसेनेचे मंत्री गेल्यामुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. चोरयासी मतदारसंघ भाजपाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. 2015 साली चोरयासीचे स्थानिक आमदार राजा पटेल याचे डेंग्युने निधन झाले. त्यानंतर इथे झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपाने झंखाना पटेल यांना उमेदवारी दिली. झंखानानेही विजय मिळवून जागा कायम राखली होती. 

देशात अन्य कुठल्याही शहराचा सूरत इतका वेगाने विकास झालेला नाही असे शिवतारे सभेमध्ये म्हणाले होते. मी माझ्या पक्षाच्यावतीने इथे आलेलो नाही. मी माझ्या कुटुंबासाठी आलोय. राजाभाई पटेल माझे जवळचे मित्र होते. मुंबईत काहीकाळ आम्ही दोघांनी एकत्र घालवला. राजाभाई आणि मी एकाचवेळेस राजकारणात प्रवेश केला. त्यांनी जमलेल्या नागरिकांना झखांना पटेलला मतदान करण्याचे आवाहन केले. शिवसेनेने गुजरातमध्ये 47 उमेदवार उभे केले होते. सूरत आणि राजकोटमध्ये शिवसेना उमेदवारांची संख्या जास्त आहे. पहिल्या टप्प्याच्या मतदानामध्ये शिवसेनेचे 30 आणि दुस-या टप्प्यात 17 उमेदवार आहेत.    

टॅग्स :Gujarat Election 2017गुजरात निवडणूक 2017Shiv Senaशिवसेना