शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

...म्हणून आज पश्चिम बंगालमधले बस चालक हेल्मेट घालून करताहेत ड्रायव्हिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2018 10:10 IST

सरकारी बसेसच्या चालकांकडून ड्रायव्हिंग करताना हेल्मेटचा वापर

कोलकाता: पश्चिम बंगालमध्ये पोलिसांशी झालेल्या बाचाबाचीत दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्यानं आज भाजपानं राज्यात बंदची हाक दिली आहे. या बंददरम्यान अनेक ठिकाणी गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे. तर काही ठिकाणी भाजपा कार्यकर्त्यांनी लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्या रोखून धरल्या आहेत. आंदोलकांनी सरकारी बसेसवर दगडफेक केली आहे. त्यामुळे बस चालक हेल्मेट घालून ड्रायव्हिंग करत आहेत. उत्तर दिनाजपूर जिल्ह्यातील इस्लामपूरमध्ये पोलिसांशी झालेल्या बाचाबाचीदरम्यान दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. या घटनेचा निषेध म्हणून आज भाजपानं पश्चिम बंगालमध्ये बंदची हाक दिली. हा बंद 12 तासांचा असणार आहे. बंदमध्ये सहभागी झालेल्या भाजपा कार्यकर्त्यांनी सरकारचा निषेध करण्यासाठी हावडा वर्धमान मार्गावरील रेल्वे गाड्या रोखल्या. याशिवाय सियालदाह-बारासत-बोनगाव सेक्शन दरम्यानची रेल्वे वाहतूकदेखील रोखून धरली. आंदोलकांनी कूच बेहरमध्ये अनेक सरकारी बसेसवर दगडफेक केली. त्यामुळे बसेसच्या काचा फुटून मोठं नुकसान केलं. यानंतर बस चालकांनी सुरक्षेचा उपाय म्हणून हेल्मेट घालून बस चालवण्यास सुरुवात केली. गेल्या काही दिवसांपासून पश्चिम बंगालमध्ये भाजपा आणि तृणमूल काँग्रेसमध्ये संघर्ष सुरू आहे. भाजपाकडून सध्या पश्चिम बंगालमध्ये हात-पाय पसरण्याचे प्रयत्न सुरू आहेत. काही दिवसांपूर्वीच भाजपा अध्यक्ष अमित शहांनी पश्चिम बंगालचा दौरा करुन नेते आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला होता.  

टॅग्स :Bus Driverबसचालकwest bengalपश्चिम बंगालBJPभाजपा