शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

'तृणमूलच्या नेत्यांना खरेदी करण्यासाठी भाजपा ट्रेन भरुन पैसे आणतेय'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2019 19:36 IST

तृणमूलच्या अध्यक्षा ममता बॅनर्जींचा भाजपावर सनसनाटी आरोप

कोलकाता: तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांना खरेदी करण्यासाठी भाजपाचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप पक्षाच्या अध्यक्षा ममता बॅनर्जींनी केला. तृणमूलच्या नेत्यांनी पक्ष सोडावा, भाजपात सामील व्हावं, यासाठी पैशांच्या ऑफर दिल्या जात आहेत. त्यासाठी राज्याबाहेरुन पैसा आणला जात आहे, असा सनसनाटी आरोप बॅनर्जींनी केला. भाजपाकडून तृणमूलच्या नेत्यांना संपर्क करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा दावादेखील त्यांनी केला. 'भाजपाकडून तृणमूलच्या नेत्यांना खरेदी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. भाजपाकडून तृणमूलच्या नेत्यांना संपर्क केला जात आहे. तुम्हाला किती पैसा हवा, आम्हाला सांगा. आम्ही तुम्हाला हवा तितका पैसा देतो, आमच्या पक्षात या,' अशा ऑफर दिल्या जात असल्याचं ममता बॅनर्जींनी सांगितलं. लोकसभा निवडणुकीच्या आधी राज्यात प्रचंड पैसा आणण्याचा भाजपाचा प्रयत्न असल्याचा दावा त्यांनी केला. 'बंगालमध्ये ट्रेननं काहीजण रोख रक्कम घेऊन येत आहेत. मतदारांना वाटण्यासाठी हा सर्व पैसा आणला जात आहे. याबद्दली स्रव माहिती माझ्याकडे आहे,' असं ममता बॅनर्जी म्हणाल्या.  ममता यांनी मोदी सरकारवर जोरदार तोफ डागली. 'मोदी सरकार शेवटच्या घटका मोजत आहे. लोकसभा निवडणुकीनंतर हे सरकार दिसणार नाही. त्यांचा शेवट जवळ आला आहे,' अशी टीका ममता यांनी केली. 'भाजपाकडून खालच्या पातळीचं राजकारण सुरू आहे. त्यामुळे आता लोकांना बदल हवा आहे,' असंदेखील त्यांनी पुढे म्हटलं. पुलवामातील दहशतवादी हल्ल्यावरुनदेखील त्या सरकारवर बरसल्या. 'पाकिस्तानविरुद्ध युद्धाच्या नावाखाली पंतप्रधान मोदी जवानांच्या जीवाशी खेळत आहेत,' असं टीकास्त्र त्यांनी सोडलं. मध्यरात्रीच्या सुमारास दुचाकींच्या रॅली काढून राज्यातील वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न भाजपाकडून सुरू आहे, असा आरोपदेखील त्यांनी केला.  

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९tmcठाणे महापालिकाBJPभाजपा