शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

ब्लॅक लिस्टमधील अगुस्ता वेस्टलँडला मेक इन इंडियात का घुसडलं, काँग्रेसचा मोदींना सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2018 17:42 IST

अगुस्ता वेस्टलँड प्रकरणावरून काँग्रेस आणि भाजपामध्ये आरोप-प्रत्यारोप होऊ लागले आहेत.

नवी दिल्ली- अगुस्ता वेस्टलँड प्रकरणावरून काँग्रेस आणि भाजपामध्ये आरोप-प्रत्यारोप होऊ लागले आहेत. काल केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकरांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला होता. चोराच्या उलट्या बोंबा, असं जावडेकर काँग्रेसला उद्देशून बोलले होते. त्यानंतर आज काँग्रेसनंही भाजपावर निशाणा साधला आहे. सरकारनं अगुस्ता वेस्टलँड या कंपनीला ब्लॅकलिस्टमधून बाहेर का काढलं, मोदी सरकार अगुस्ता वेस्टलँड हा कंपनीचे हितचिंतक आहेत काय, असा प्रश्न काँग्रेसनं उपस्थित केला आहे. मोदी सरकारनं अगुस्ता वेस्टलँड या कंपनीला काळ्या यादीतून हटवून मेक इन इंडियाचा एका भाग बनवलं.मोदी सरकारनं स्वतःची कपटी रणनीती लपवण्यासाठीच मोदी बचावचा नारा दिला आहे. अगुस्ता वेस्टलँड प्रकरणात 12 फेब्रुवारी 2013 रोजी काँग्रेसच्या नेतृत्वातील यूपीए सरकारनं चौकशीचे आदेश दिले होते. त्यानंतर हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आलं होतं. आता हाच मुद्दा घेऊन काँग्रेसनं मोदींवर निशाणा साधला आहे. मोदी सरकार अगुस्ता वेस्टलँड कंपनीचे हितचिंतक आहेत, मोदी सरकारनं 100 नौसैनिक हेलिकॉप्टरसाठी बोली लावण्यास अगुस्ता वेस्टलँडसारख्या ब्लॅकलिस्टेड कंपनीला परवानगी कशी दिली ?, असा प्रश्नही सुरजेवाला यांनी उपस्थित केला आहे. 27 फेब्रुवारी 2013मध्ये तत्कालीन संरक्षण मंत्री ए. के. अँटोनी यांनी जेपीसीच्या चौकशीचे आदेश दिले होते. परंतु भाजपानं त्याकडे दुर्लक्ष केलं. मोदी सरकार यांनी अगुस्ता वेस्टलँड आणि त्यांचं स्वामित्व असलेली फिनमेकॅनिका कंपनीला ब्लॅकलिस्टमधून का हटवलं, असा प्रश्नही काँग्रेसनं उपस्थित केला आहे.

टॅग्स :Agusta Westland Scamऑगस्टा वेस्टलँड घोटाळाcongressकाँग्रेस