नवी दिल्ली- भाजपानं दहशतवादी मसूद अझहर आणि चीनच्या प्रकरणावरून राहुल गांधींवर पलटवार केला आहे. केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी राहुल गांधींच्या ट्विटवर आक्षेप नोंदवला आहे. जेव्हा देश दुःखात असतो, तेव्हा राहुल गांधी सेलिब्रेशनच्या मूडमध्ये असतात. राजकारणात नेहमीच अंतर ठेवलं पाहिजे. विरोध असतो आणि तो झालाही पाहिजे.चीननं पुन्हा एकदा जुन्याच नीतीचा वापर केल्यानं राहुल गांधी खूश आहेत काय ?, राहुल गांधींचं ट्विट आता पाकिस्तानमध्ये हेडलाइन होईल. पाकिस्तानी मीडियामध्ये झळकलेली ट्विट आणि कमेंट पाहून राहुल गांधींना आनंद होतो आहे. तुमच्याच पूर्वजांच्या कारणास्तव चीन सुरक्षा परिषदेचा सदस्य आहे, असंही रविशंकर प्रसाद म्हणाले आहेत.
तुमच्याच पूर्वजांमुळे चीन सुरक्षा परिषदेचा सदस्य, भाजपाचा राहुल गांधींवर पलटवार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2019 15:03 IST