शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

...म्हणून राहुल गांधी यांनी काश्मीरबाबत बदलले आपले मत, भाजपाचा टोला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2019 17:05 IST

काश्मीर प्रश्नावरून आपले विधान बदलणारे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर भाजपाने जोरदार टीका केली आहे.

नवी दिल्ली - काश्मीर प्रश्नावरून आपले विधान बदलणारे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर भाजपाने जोरदार टीका केली आहे. राहुल गांधी यांनी काश्मीरबाबतचे आपले विधान मनापासून नव्हे तर  निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे बदलले, असा टोला भाजपाने लगावला आहे. राहुल गांधी हे पाकिस्तानच्या हातचे खेळणे बनले आहेत. त्यांच्या विधानाचा शेजारील देशाकडून संयुक्त राष्ट्रांमध्ये भारताविरोधात वापर होत आहे. त्यामुळे राहुल गांधी आणि  काँग्रेसने याप्रकरणी माफी मागितली पाहिजे, अशी मागणी भाजपाने केली आहे. कलम 370 हटविण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात विरोधी पक्षातील नेत्यांनी अनेक विधाने केली होती. याच विधानाचा वापर करून पाकिस्तान आंतरराष्ट्रीय स्तरावर फायदा उचलण्याचा प्रयत्न करत आहे. पाकिस्तानने संयुक्त राष्ट्र संघाला लिहिलेल्या पत्रात काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी दिलेल्या विधानाचा हवाला देत काश्मीरमधील स्थिती खराब असल्याचा दावा केला आहे. मात्र राहुल गांधींच्या विधानाचा वापर पाकिस्तानने केल्याने देशाच्या राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. त्यानंतर आज राहुल गांधी यांनी आपले वक्तव्य बदलत काश्मीर प्रश्न हा भारताचा अंतर्गत प्रश्न आहे, अशा दावा केला.राहुल गांधी यांनी आपले वक्तव्य बदलल्यानंतर भाजपाकडून त्यावर  जोरदात टीका करण्यात आली आहे. भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी प्रसामाध्यमांशी बोलताना राहुल गांधींवर चौफेर हल्ला केला. ''राहुल गांधी यांनी केलेली विधाने दिवाळखोरीचे लक्षण आहे. काश्मीरमध्ये जे घडले नाही, ते राहुल गांधी बोलले आहेत. ते पाकिस्तानच्या हातचे खेळणे बनले आहेत. त्यांच्या विधानाचा आधार घेत पाकिस्तानने संयुक्त राष्ट्रांमध्ये पत्र दिले आहे. त्यानंतर विरोधाचा सूर उमटू लागल्यावर राहुल गांधी यांनी यू टर्न घेतला आहे.'' अशी टीका जावडेकर यांनी केली. राजकीय वातावरण पाहता राहुल गांधींनी पुन्हा एकदा ट्वीट करून स्पष्ट केलं आहे की, काश्मीर भारताचा अंतर्गत प्रश्न आहे. त्यामुळे पाकिस्तानसह इतर देशांनी या प्रकरणात हस्तक्षेप करू नये त्यासोबत काश्मीरमधील हिंसाचाराला पाकिस्तान जबाबदार असल्याचा आरोप केला आहे.  

दरम्यान, राहुल गांधी यांनी आपले वक्तव्य बदलल्यानंतर  पाकिस्तानचे सूचना आणि माहिती प्रसारण मंत्री फवाद हुसैन यांनी राहुल गांधीवर टीका केली आहे. फवाद हुसैन यांनी ट्विटमध्ये लिहिलंय की, तुमचं गोंधळलेलं राजकारण ही मोठी समस्या आहे. तुमची भूमिका वास्तववादी असणं गरजेचे होते. तुम्ही तुमच्या आजोबांकडून बोध घ्यायला हवा होता. त्यांनी भारतात धर्मनिरपेक्षता आणि पुरोगामी विचारांचे प्रतिनिधित्व केले. फवाद यांनी आपल्या ट्वीटसोबत एक शायरीही सांगितली आहे. 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरRahul Gandhiराहुल गांधीPrakash Javadekarप्रकाश जावडेकरcongressकाँग्रेसBJPभाजपा