शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

"पंतप्रधान मोदींशी पंगा घेतला तर राजकीय जीवन संपुष्टात येईल"; भाजपा नेत्याचा मुख्यमंत्र्यांना इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2021 08:31 IST

BJP Arvind Dharmapuri And K Chandrashekhar Rao : भाजपा खासदार अरविंद धर्मपुरी यांनी केसीआर यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे.

नवी दिल्ली - तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव (K Chandrashekhar Rao) यांनी मोदी सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली असून निशाणा साधला आहे. यानंतर भाजपा खासदार अरविंद धर्मपुरी (BJP Arvind Dharmapuri) यांनी केसीआर यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे. निजामाबाद लोकसभा मतदारसंघाचे खासदार धर्मपुरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी केसीआर यांनी पंगा घेतला तर त्यांचे राजकीय जीवन संपुष्टात येईल असं म्हटलं आहे. तसेच केसीआर यांच्या राजकीय मृत्यूची वेळ आली आहे असं वादग्रस्त विधान देखील केलं आहे. ते जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप केला आहे. 

अरविंद धर्मपुरी यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना "जेव्हा गिधाडाचा मृत्यू जवळ येतो तेव्हा तो शहराकडे धावतो. तसेच आता केसीआर यांच्या राजकीय मृत्यूची वेळ आली आहे, म्हणून ते मोदींशी पंगा घेत आहेत आणि केंद्र सरकारशी खोटे बोलत आहेत" असं म्हटलं आहे. तसेच शेतकऱ्यांचा संदर्भ देत धर्मपुरी म्हणाले की "काय पेरणी करावी आणि काय करू नये, हे ना आम्ही कधी शेतकऱ्यांना सुचवले आहे, ना आम्ही शेतकऱ्यांकडून पीक खरेदी करणार नाही, असे कधी सांगितले नाही. केसीआर जनतेची दिशाभूल करत आहेत." यासोबतच पुरस्कारासाठी राज्यातील लोकांची मुख्यमंत्र्यांनी शिफारस का केली नाही" असा सवाल धर्मपुरी यांनी केला आहे. 

मोदी सरकारवर तेलंगणातील लोकांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप

तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी सोमवारी मोदी सरकारवर तेलंगणातील लोकांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला. मोदी सरकार आपल्या राज्यातील जनतेला जाणीवपूर्वक पुरस्कार देत नाही असं म्हटलं आहे. काही दिवसांपूर्वी तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी एक वादग्रस्त विधान केलं आहे. "जीभ कापून टाकू" असं म्हणत थेट भाजपा नेत्यांना इशारा दिला आहे. तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष बंदी संजय कुमार यांच्यावर जोरदार टीका केली. तसेच राज्यातील शेतकऱ्यांकडून धान्य खरेदी करण्याचे आश्वासन फसवे असल्याचं म्हटलं. याच दरम्यान मुख्यमंत्र्यांनी भाजपा नेत्यांना आमच्याबद्दल अनावश्यक गोष्टी बोलणं टाळा नाहीतर जीभ कापून टाकू असा इशाराही दिला. केसीआर यांनी केंद्र सरकारने हे स्पष्ट केले आहे की ते धान्य खरेदी करणार नाही आणि कृषीमंत्र्यांनी शेतकऱ्यांना दुसरे पीक निवडण्यास सांगितले आहे असं म्हटलं आहे.

"...तर जीभ कापून टाकू"; तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांचा भाजपा नेत्यांना इशारा

"तुम्ही आमच्याबद्दल उद्धटपणे बोललात तर आम्ही तुमच्या (राज्यातील भाजपा नेत्यांच्या) जीभ कापून टाकू" असं म्हटलं आहे. "संजय म्हणाले होते की ते मला तुरुंगात पाठवणार आहेत. मी त्यांना मला स्पर्श करण्याचे आव्हान देतो. शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून भाजपावर टीका करताना केसीआर म्हणाले की, आम्ही केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांना विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांसोबत आहोत. "शेती कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना आम्ही पाठिंबा देऊ. शेतकऱ्यांना वाचवण्याची जबाबदारी आपली आहे. विरोधक राजकारण करुन शेतकर्‍यांच्या भावनांशी खेळत आहेत. तेलंगणा राष्ट्र समिती (टीआरएस) शेतकर्‍यांच्या हक्कासाठी केंद्राविरोधात आंदोलन करणार आहे" असंही के चंद्रशेखर राव यांनी म्हटलं आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाTelanganaतेलंगणाPoliticsराजकारण