शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

देवेंद्र फडणवीसांवर पक्षानं सोपवली मोठी जबाबदारी; पुन्हा फत्ते करणार कामगिरी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2021 12:01 IST

विरोधी पक्षनेतेपद देवेंद्र फडणवीसांवर पक्षानं पुन्हा दाखवला विश्वास; बिहारची पुनरावृत्ती करण्याची जबाबदारी

नवी दिल्ली: विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर पक्षानं महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. राज्यात भाजपचं नेतृत्त्व करणारे फडणवीस गोवा विधानसभा निवडणुकीत पक्षासाठी महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. भाजप नेतृत्त्वानं गोवा विधानसभेचे प्रभारी म्हणून फडणवीस यांची नियुक्ती केली आहे. याआधी बिहार विधानसभा निवडणुकीत फडणवीस यांनी उत्तम कामगिरी केली आहे. २०२० मध्ये झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपनं ७० हून अधिक जागा जिंकत संयुक्त जनता दलासह सत्ता कायम ठेवली. त्यामुळे आता गोव्यात फडणवीस काय करणार याकडे अनेकांचं लक्ष लागलं आहे.

गोवा विधानसभेची निवडणूक पुढील वर्षी होत आहे. गोवा राज्य आकारानं लहान आहे. मात्र ते संवेदनशील समजलं जातं. गोवा बराच काळ अस्थिर राहिलं आहे. मनोहर पर्रिकरांच्या नेतृत्त्वाखाली गोव्याला स्थिर सरकार मिळालं. मात्र त्यांच्या निधनानंतर गोवा भाजपमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली. २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपला गोव्यात १३ जागा मिळाल्या. त्यांच्या ८ जागा कमी झाल्या होत्या. काँग्रेसनं १७ जागा जिंकल्या. मात्र काँग्रेसपेक्षा कमी जागा जिंकूनही भाजपनं छोट्या पक्षांना सोबत घेत सरकार स्थापन केलं.किरीट सोमय्यांना मोदी सरकारकडून 'पॉवर'?; ठाकरे सरकार वि. भाजप संघर्ष पेटणारभाजप यंदा बहुमत गाठणार?गोव्यात विधानसभेचे ४० मतदारसंघ आहेत. सत्ता स्थापन करण्यासाठी २१ हा जादुई आकडा आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप बहुमतापासून बराच दूर राहिला होता. मात्र मनोहर पर्रिकर मुख्यमंत्री होणार असतील, तर आम्ही भाजपला पाठिंबा देऊ, अशी भूमिका गोवा फॉरवर्ड पक्षानं घेतली. यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी सूत्रं हलवली. पक्ष नेतृत्त्वानं हिरवा कंदिल दाखवला आणि पर्रिकर गोव्याचे मुख्यमंत्री झाले. पर्रिकर यांचं मार्च २०१९ मध्ये निधन झालं. त्यांच्या निधनानंतर भाजप पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीत उतरत आहे.

बिहारमध्ये फडणवीसांची रणनीती यशस्वीराज्यात भाजपचा चेहरा असलेले फडणवीस पंतप्रधान नरेंद्र मोदींचे विश्वासू म्हणून ओळखले जातात. त्यामुळेच राज्यातील भाजपचं सरकार गेल्यानंतरही त्यांनाच विरोधी पक्षनेतेपद देण्यात आलं. गेल्या वर्षी बिहारमध्ये विधानसभा निवडणूक झाली. या निवडणुकीची जबाबदारी फडणवीसांनी सांभाळली. मित्रपक्ष संयुक्त जनता दलापेक्षा अधिक जागा जिंकत भाजपनं या निवडणुकीत कमाल केली. फडणवीसांनी निवडणुकीचं उत्तम व्यवस्थापन केल्यानं भाजप बिहारमध्ये मोठा भाऊ झाला, तर जेडीयूला लहान भावाच्या भूमिकेत जावं लागलं.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBiharबिहारgoaगोवाBJPभाजपाManohar Parrikarमनोहर पर्रीकर