शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

Delhi Election Result: 2 वर्षांत एनडीएनं 6 राज्यांत गमावली सत्ता, दिल्लीच्या निकालानं वाढवलं भाजपाचं टेन्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2020 09:49 IST

दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल लागलेला असून, आम आदमी पार्टीकडे जनतेनं तिसऱ्यांदा सत्ता सोपवलेली आहे.

ठळक मुद्देदिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल लागलेला असून, आम आदमी पार्टीकडे जनतेनं तिसऱ्यांदा सत्ता सोपवलेली आहे. देशाच्या राजधानीच्या विधानसभेची किल्ली भाजपाला कोणत्याही परिस्थितीत स्वतःच्या हातात ठेवायची होती. परंतु त्यात त्यांना यश आलेलं नाही. 70 जागांच्या या दिल्ली विधानसभेत भाजपाला 10चा आकडाही गाठता आलेला नाही.

नवी दिल्लीः दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल लागलेला असून, आम आदमी पार्टीकडे जनतेनं तिसऱ्यांदा सत्ता सोपवलेली आहे. पण या निकालानं भाजपाचं टेन्शन वाढवलं आहे. देशाच्या राजधानीच्या विधानसभेची किल्ली भाजपाला कोणत्याही परिस्थितीत स्वतःच्या हातात ठेवायची होती. परंतु त्यात त्यांना यश आलेलं नाही. विशेष म्हणजे 70 जागांच्या या दिल्ली विधानसभेत भाजपाला 10चा आकडाही गाठता आलेला नाही. भाजपा 3हून वाढून 8 जागांवर पोहोचली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर आतापर्यंत झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला फक्त हरणायाची सत्ता काबिज करता आलेली आहे. उर्वरित राज्यांतील सत्ता त्यांच्या हातून निसटली आहे. गेल्या दोन वर्षांच्या भाजपा आणि एनडीएच्या कामगिरीवर नजर टाकल्यास त्यांच्या हातून सहा राज्यांतील सत्ता गेली आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी चार राज्यांच्या निवडणुका झाल्या होत्या. मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड आणि मिझोराम या चारही राज्यांत भाजपाला सत्ता मिळवता आलेली नाही. लोकसभा निवडणुकीदरम्यान आणखी एक राज्य भाजपा आणि एनडीएपासून दुरावलं. आंध्र प्रदेशमध्ये भाजपा तेलगु देसमबरोबर सत्तेत होती. परंतु निवडणुकीपूर्वीच टीडीपीनं भाजपाची साथ सोडली. विधानसभा निवडणुकीत आंध्र प्रदेशच्या सत्तेतून भाजपाबरोबर टीडीपीसुद्धा बाहेर गेली. लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकांत महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये भाजपाला हरियाणात सत्ता मिळाली, पण झारखंड राज्य त्यांनी गमावलं. महाराष्ट्रात सर्वात मोठा पक्ष ठरूनही भाजपाला विरोधी पक्षात बसावं लागलं.अशा प्रकारे एकापाठोपाठ एका राज्यातून भाजपाला सत्ता गमवावी लागली आहे. दिल्लीत भाजपाचा लाजिरवाणा पराभवदिल्लीत भाजपाला पुन्हा एकदा मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत झालेल्या पराभवामुळे भाजपाची चिंता वाढलेली आहे. भाजपाला दिल्लीतली सत्ता हवी होती, त्यासाठी त्यांनी संपूर्ण ताकद पणाला लावली होती. परंतु आम आदमी पार्टीनं पुन्हा एकदा 62 जागांवर विजय मिळवत सत्ता हस्तगत केली. दोन वर्षांपूर्वीचा विचार केल्यास डिसेंबर 2017मध्ये भाजपा आणि त्यांचे मित्र पक्षांची 19 राज्यांमध्ये सत्ता होती.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीdelhi electionदिल्ली निवडणूकBJPभाजपाAmit Shahअमित शहा