शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

CAA: धर्माच्या नावाखाली भेदभाव नको, मुस्लिमांनाही नागरिकत्व द्या; भाजपाच्या मित्रपक्षाची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2019 16:36 IST

भाजपाच्या आणखी एका मित्रपक्षाची वेगळी भूमिका

चंदिगढ: आसाम गण परिषदेनं सुधारित नागरिकत्व कायदा प्रकरणात यू-टर्न घेतल्यानंतर आता भाजपाच्या आणखी एका मित्रपक्षानं घूमजाव केलं आहे. नव्या कायद्यात मुस्लिमांचादेखील समावेश करा, अशी मागणी पंजाबमधील भाजपाचा मित्रपक्ष असलेल्या शिरोमणी अकाली दलानं केली आहे. भारत हा धर्मनिरपेक्ष देश असल्यानं नव्या कायद्यातून मुस्लिमांना वगळणं योग्य ठरणार नाही, अशी भूमिका शिरोमणी अकाली दलानं घेतली आहे. सुधारित नागरिकत्व विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये मंजूर झाल्यानंतर त्यावर राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केली. त्यामुळे त्या विधेयकाला कायद्याचं स्वरुप प्राप्त झालं. अकाली दलाचे सचिव आणि प्रवक्ते दलजित सिंग चीमा यांनी याचं स्वागत केलं. यामुळे अनेक अल्पसंख्याकांना भारताचं नागरिकत्व मिळेल आणि त्यांचं जीवन सुखकर होईल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. यासोबतच त्यांनी नव्या कायद्याचा लाभ मुस्लिम समुदायालादेखील मिळावा, अशी मागणी केली. 'पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तानातून भारतात आलेल्या हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारशी आणि ख्रिश्चन धर्मीय स्थलांतरितांना कित्येक वर्षांपासून भारताचं नागरिकत्व नव्हतं. आपल्या देशातून अत्याचारांना कंटाळून भारतात दाखल झालेल्यांना सोयी सुविधांपासून वंचित राहावं लागायचं. केंद्र सरकारनं सुधारित नागरिकत्व कायद्याला मंजुरी देऊन त्यांना नवं आयुष्य दिलं आहे. मात्र यामध्ये मुस्लिमांचा समावेश करण्यात आलेला नाही,' असं चीमा म्हणाले. मुस्लिमांचादेखील सुधारित नागरिकत्व कायद्यात समावेश करण्यात यावा, अशी मागणी चीमा यांनी केली. आमच्या पक्षाची भूमिका अतिशय स्पष्ट आहे. मुस्लिमांनाही नव्या कायद्याचा लाभ मिळायला हवा. आपला देश धर्मनिरपेक्ष आहे. त्यामुळे धर्माच्या आधारावर कोणावरही अन्याय होऊ नये. या गोष्टींचा विचार करुन केंद्र सरकारनं नव्या कायद्यात मुस्लिमांनादेखील समाविष्ट करावं, असं चीमा यांनी म्हटलं.  मात्र या कायद्याविरोधात रस्त्यावर उतरुन हिंसाचार करुन सार्वजनिक संपत्तीचं नुकसान करणाऱ्यांचा अकाली दलानं निषेध केला.  

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकShiromani Akali Dalशिरोमणी अकाली दलBJPभाजपा