शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

गुजरातमधील सहाही महापालिकांमध्ये भाजपच; ‘आप’, एमआयएमचा चंचुप्रवेश, काँग्रेसला मोठा फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2021 06:43 IST

५७६ पैकी ४९० जागांवर विजय, ‘आप’, एमआयएम यांचा चंचुप्रवेश, काँग्रेसला मोठा फटका

अहमदाबाद : गुजरातमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपने गड राखत निर्भेळ यश मिळविले. सहा महापालिकांच्या एकूण ५७६ जागांपैकी भाजपने ४९० जागा जिंकल्या. काँग्रेसला या निवडणुकीत माेठा फटका बसला असून केवळ ४८ जागा जिंकता आल्या आहेत. तर आम आदमी पार्टी व एमएआयएमने गुजरातच्या पालिकांमध्ये प्रवेश मिळविला, हे या निवडणुकीचे वैशिष्ट्य ठरले आहे.

अहमदाबाद, सुरत, बडाेदा, राजकाेट, भावनगर आणि जामनगर येथील महापालिकांसाठी मतदान झाले हाेते. मंगळवारी त्याची मतमाेजणी झाली. भाजपने सर्व महापालिकांमध्ये सत्ता कायम ठेवली. काँग्रेसचा मात्र या निवडणुकीत धुव्वा उडाला आहे. ‘आप’ने सुरत महापालिकेत २७ जागा जिंकल्या. तर अहमदाबादमध्ये ‘एमआयएम’ ने ८ जागा जिंकून चंचूप्रवेश केला.

भाजपमध्ये उत्साह; पंतप्रधानांनी ट्विट करून मानले जनतेचे आभार

निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी ट्वीट केले असून गुजरातच्या जनतेने भाजपवर पुन्हा विश्वास ठेवल्याबद्दल आभार मानले आहेत. भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनीही मतदारांचे आभार मानून गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणींचे अभिनंदन केले. विजय रुपाणी यांनीही महापालिका विजयानंतर मतदारांचे आभार मानले. ’ॲंटी इन्कम्बंसी’ गुजरातमध्ये लागू पडत नाही, असे ते म्हणाले.

टॅग्स :BJPभाजपाGujaratगुजरातcongressकाँग्रेस