बिजदने दिले पाठिंब्याचे संकेत
By Admin | Updated: May 15, 2014 03:07 IST2014-05-15T03:07:46+5:302014-05-15T03:07:46+5:30
केंद्रातील नव्या सरकारला पाठिंबा देण्याबाबत विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री नवीन पटनायक म्हणाले, आम्ही अद्याप काही विचार केलेला नाही

बिजदने दिले पाठिंब्याचे संकेत
भुवनेश्वर : केंद्रात भाजपाच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीसोबत सत्ता स्थापण्याकरिता अद्यापही निश्चित स्वरूपात चर्चा होत नसली तरी, भाजपाला पाठिंबा देण्याचेही आपण अद्याप नाकारले नाही, असे प्रतिपादन करून रालोआ सरकारला पाठिंबा देण्याचे संकेत बीजदने दिले आहेत. केंद्रातील नव्या सरकारला पाठिंबा देण्याबाबत विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री नवीन पटनायक म्हणाले, आम्ही अद्याप काही विचार केलेला नाही. निवडणुकांचे निकाल जाहीर होईपर्यंत वाट पाहू या. बीजदचे एक मुख्य प्रतोद पर्वत त्रिपाठी यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांचा पक्ष रालोआला पाठिंबा देऊ शकतो, असे सांगून हा संकेत दिला आहे. या मुलाखतीत त्यांनी पुढे पूर्ण देश व राज्याच्या हिताला समोर ठेवून केंद्रात येऊ घातलेल्या रालोआ सरकारला सशर्त पाठिंबा देण्यात कोणतीच अडचण येऊ नये, असे म्हटले आहे. याबाबत पक्षाचे सुप्रीमो पटनायक हेच अंतिम निर्णय घेतील, असे त्यांनी स्पष्ट केले. पक्षाचे खासदार जय पांडा यांनी केंद्रात नव्या सरकारला सशर्त पाठिंबा देण्याचा मुद्दा व्यक्त केला आहे. मात्र यावर अजून चर्चा करण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे.