शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

निर्भिड पत्रकारिता करण्यासाठी त्यांनी राजकारणातून घेतली निवृत्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2019 16:42 IST

ओदिशामधील एका खासदारांनी चक्क पत्रकारितेमध्ये पुन्हा प्रवेश करण्यासाठी राजकारणाला रामराम ठोकल्याचे दुर्मीळ चित्र समोर आले आहे.

ठळक मुद्देतथागत सत्पथी असे पत्रकारितेसाठी राजकारण सोडणाऱ्या खासदारांचे नाव बिजू जनता दल पक्षाचे नेते असलेले सत्पथी हे चार वेळा खासदार म्हणून निवडून आले आहेततथागत सत्पती यांच्या कुटुंबाला राजकारणाचा प्रदीर्घ वासरा असून, त्यांच्या मातोश्री नंदिनी सत्पथी या प्रख्यात लेखिका आणि ओदिशाच्या माजी मुख्यमंत्री होत्या

नवी दिल्ली - गेल्या काही वर्षांमध्ये राजकारण हे जनसेवेपेक्षा सत्ता, प्रसिद्धी आणि संपत्ती मिळण्याचे साधन बनले आहे. त्यामुळे विविध क्षेत्रात कार्यरत असलेली मंडळी राजकारणात प्रवेश करण्याची संधी शोधत असतात. मात्र ओदिशामधील एका खासदारांनी चक्क पत्रकारितेमध्ये पुन्हा प्रवेश करण्यासाठी राजकारणाला रामराम ठोकल्याचे दुर्मीळ चित्र समोर आले आहे. तथागत सत्पथी असे पत्रकारितेसाठी राजकारण सोडणाऱ्या खासदारांचे नाव असून, बिजू जनता दल पक्षाचे नेते असलेले सत्पथी हे चार वेळा खासदार म्हणून निवडून आले आहेत.  राजकारणात स्थिरस्थावर झाल्यानंतर अनेकजण अखेरच्या श्वासापर्यंत पदाला चिकटून राहतात. मात्र प्रदीर्घ राजकीय वारसा लाभलेला असूनही सत्पथी यांनी राजकारण सोडून आपला मूळ पेशा असलेल्या पत्रकारितेकडे वळण्याचा निर्णय घेतला. तथागत सत्पती यांच्या कुटुंबाला राजकारणाचा प्रदीर्घ वासरा असून, त्यांच्या मातोश्री नंदिनी सत्पथी या प्रख्यात लेखिका आणि ओदिशाच्या माजी मुख्यमंत्री होत्या. नंदिनी सत्पथी यांनी 14 जून 1972 ते 16 डिसेंबर 1976 या काळात ओदिशाचे मुख्यमंत्रिपद भूषवले होते. 

 तथागत सत्पथी हे ओदिशामधील ढेंकनाल लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत.  दरम्यान, पत्रकारितेमध्ये पुन्हा येण्यासाठी त्यांनी वयाच्या 62 व्या वर्षी राजकारणातून निवृत्ती स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे.  या निर्णयाबाबत ते म्हणाले की, ''सध्या पत्रकारितेला निडर आणि निर्भिड आवाजांची गरज आहे. त्यामुळे पत्रकारितेवर पुन्हा एकदा लक्ष्य केंद्रित करण्यासाठी मी राजकारणापासून दूर जाण्याचा निर्णय घेतला आहे. माझ्या दीर्घ राजकीय प्रवासादरम्यान केलेल्या सहकार्याबद्दल मी मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांचा आभारी आहे. मात्र आता जनसेवेसाठी राजकारण हे माध्यम नाही याची जाणीव मला झाली आहे.'' 

 दरम्यान, आपल्याला मतदान करणाऱ्या मतदारांचेही सत्पथी यांनी आभार मानले आहेत. ज्या मतदारांनी आम्हाला नेहमीच पाठिंबा आणि प्रेम दिले त्यांचे मी आभार मानतो. देशामध्ये सामाजिक नेतृत्वाचा अभाव आहे तसेच युवा नेतृत्वाला पुढे आणण्याचीही हीच योग्य वेळ आहे.'' असेही सत्पती म्हणाले. 

 

टॅग्स :PoliticsराजकारणBiju Janata Dalबिजू जनता दलOdishaओदिशाIndiaभारत