शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

...तर त्यांची नखं तोडून टाकेन; विप्लव देव यांची जीभ पुन्हा घसरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2018 17:51 IST

एकापाठोपाठ एक वादग्रस्त विधानं केल्यानं वाचाळवीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विप्लव देव यांचा नवा व्हिडीओ व्हायरल झालाय.

नवी दिल्लीः महाभारत काळातही इंटरनेट आणि उपग्रह होते, असा चमत्कारिक दावा करून चर्चेत आलेले आणि नंतर एकापाठोपाठ एक वादग्रस्त विधानं करणारे त्रिपुराचे मुख्यमंत्री विप्लव देव यांची जीभ पुन्हा घसरली आहे. 

'सकाळी ८ वाजता भाजी विक्रेता बाजारात दुधी घेऊन येतो आणि ९ वाजेपर्यंत त्यांची पार वाट लागते. कारण, येणारा प्रत्येक ग्राहक या दुधीला नखं लावत असतो. मी असं होऊ देणार नाही.  माझ्या सरकारला कुणीही हात लावू शकत नाही. त्यात कुणी नाक खुपसलं, हस्तक्षेप करायचा प्रयत्न केला तर मी त्यांची नखंच तोडून टाकेन', असं विधान करून विप्लव देव यांनी पुन्हा नवा वाद ओढवून घेतलाय. त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. विप्लव देव यांचा हा वाचाळपणा भाजपासाठी डोकेदुखी ठरणारा असल्यानं, पक्षनेतृत्व त्यांच्याबाबत काय भूमिका घेतं, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय. 

त्रिपुरामध्ये भाजपानं ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर, तरुण-तडफदार विप्लव देव यांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ घातली होती. त्यांच्याकडून सगळ्यांच्याच अपेक्षा उंचावल्या असताना, एका भलत्याच विधानामुळे ते प्रकाशझोतात आले. महाभारत काळातही इंटरनेट आणि सॅटेलाइट अस्तित्वात होतं, असं अजब तर्कट त्यांनी मांडलं होतं. त्यावरून सुरू झालेली शाब्दिक चकमक थांबते न थांबते, तोच मिस युनिव्हर्स डायना हेडन हिचं जिंकणं फिक्सिंग होतं, असा दावा त्यांनी केला. त्यावरूनही खल झाला. पण, विप्लव देव स्वस्थ बसले नाहीत. तरुणांनी नोकरीच्या मागे धावण्यापेक्षा पान टपऱ्या उघडाव्यात, गायी पाळाव्यात, असा विचित्र सल्ला देऊन ते पुन्हा टीकेचे धनी ठरले होते. हे कमी म्हणून की काय, आता त्यांनी नखं तोडण्याची धमकी दिली आहे. ती नेमकी कुणासाठी आहे, यावरून उलटसुलट तर्कवितर्क लढवले जाताहेत. दरम्यान, विप्लव यांच्या वाचाळपणाची दखल घेऊन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना 'समन्स' धाडल्याची चर्चा होती. परंतु, अजून तरी त्यांची भेट झालेली नाही. 

टॅग्स :Biplab Debबिप्लब देवTripuraत्रिपुराBJPभाजपा