शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

Corona Vaccination: मोठी बातमी! जगातील सर्वात स्वस्त लस भारतात येणार?; कोरोना लसीकरणाचा वेग वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2021 12:17 IST

Corona Vaccination: केंद्र सरकार आणि बायोलॉजिकल-ई कंपनीसोबत महत्त्वाचा करार; ३० कोटी डोस मिळणार

नवी दिल्ली: देशात आलेली कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका टाळण्यासाठी लसीकरणाचा वेग वाढवणं गरजेचं आहे. त्यामुळे केंद्र सरकारनं बायोलॉजिकल-ई सोबत एक महत्त्वाचा करार केला आहे. सरकारनं कंपनीला ३० कोटी रुपये रक्कम आगाऊ दिली आहे. त्याबदल्यात कंपनी ३० कोटी डोस राखीव ठेवणार आहे.आता येणार कोरोना लसींचा पूर? तब्बल ६० विविध लसी ‘क्लिनिकल ट्रायल’मध्येआरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, ऑगस्ट ते डिसेंबर २०२१ दरम्यान बायोलॉजिकल-ई कंपनी लसींचा साठा करेल. बायोलॉजिकल-ई तयार करत असलेली लस आरबीडी प्रोटिन सब युनिट प्रकारातील आहे. यामध्ये SARS-CoV-२ चे रिसेप्‍टर-बायडिंग डोमेन (RBD)  डिमेरिक स्वरुपाचा वापर अँटिजेन म्हणून करण्यात आला आहे. लसीची क्षमता वाढवण्यासाठी त्यात एक CpG १०१८ चा वापर करण्यात आला आहे. या लसीचे दोन डोस घ्यावे लागतील. यामधलं अंतर २८ दिवसांचं असेल. त्यामुळे लसीकरण लवकर पूर्ण होऊ शकेल.हाफकिनची लस थेट पुढच्या वर्षी बाजारात येणार; विविध परवानग्यासाठी अद्याप अर्जच नाहीतबायोलॉजिकल-ई कंपनीला २४ एप्रिल रोजी तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या करण्याची मंजुरी मिळाली. कंपनीनं पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील चाचण्या नोव्हेंबर २०२० मध्ये सुरू केल्या. ३६० जणांवर करण्यात आलेल्या चाचणीबद्दलची आकडेवारी कंपनीनं जाहीर केलेली नाही. चाचण्यांचे निष्कर्ष सकारात्मक असल्याची त्रोटक माहिती कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालिका महिमा डाटला यांनी दिली आहे. आता तिसऱ्या टप्प्यात देशातील १५ ठिकाणी १ हजार २६८ जणांवर तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या केल्या जातील. याशिवाय संपूर्ण जगातलही कंपनी चाचण्या घेईल.केंद्र सरकार ३० डोससाठी कंपनीला १५०० कोटी रुपये देणार आहे. म्हणजेच एका डोससाठी सरकार ५० रुपये मोजेल. बाजारात ही लस कितीला मिळेल याबद्दल नेमकी माहिती उपलब्ध नाही. मात्र ही जगातील सर्वात स्वस्त लस असण्याची दाट शक्यता आहे. एका वृत्तानुसार, लसीच्या एका डोसची किंमत १.५ डॉलर प्रति डोस (११० रुपये) असू शकते. भारतात तयार झालेली कोविशील्ड लस ६५० रुपये आहे. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस