महापालिकेत जैेविक विविधता समिती दुर्लक्ष: स्वयंसेवी संस्थेचा प्रतिनिधी नाहीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2016 00:34 IST2016-02-05T00:34:05+5:302016-02-05T00:34:05+5:30
जळगाव : महापालिकेने शासन आदेशानुसार जैविक विविधता समिती स्थापन केली मात्र त्यात एखादा अभ्यासक वा स्वयंसेवी संस्थेचा एकही प्रतिनिधी नसल्याने या संदर्भातील अभ्यासक वर्गाकडून नाराजी व्यक्त होत आहे.

महापालिकेत जैेविक विविधता समिती दुर्लक्ष: स्वयंसेवी संस्थेचा प्रतिनिधी नाहीच
ज गाव : महापालिकेने शासन आदेशानुसार जैविक विविधता समिती स्थापन केली मात्र त्यात एखादा अभ्यासक वा स्वयंसेवी संस्थेचा एकही प्रतिनिधी नसल्याने या संदर्भातील अभ्यासक वर्गाकडून नाराजी व्यक्त होत आहे. शासन आदेशानुसार प्रत्येक महापालिकेत जैविक विविधता समिती स्थापन करणे अनिवार्य आहे. महिन्यातून एकदा बैठक होणे आवश्यक आहे. शहरातील जैव संसाधनांच्या नोंदी ठेवणे, शहर क्षेत्रातील पारंपरिक वनस्पती, पशु,पक्षी विषयक गणना, त्यांच्या नोंदी यंत्रणेच्या माध्यमातून ठेवणे असे या समितीचे कार्य आहे. याबाबत शासनाकडून वेळोवेळी सूचना होऊनही समिती स्थापन नव्हती. अखेर याबाबत निर्णय होऊन आठ जणांचा समावेश असलेली समिती स्थापन झाली आहे. महापौर अध्यक्ष या समितीत राखी शामकांत सोनवणे या अध्यक्ष आहेत. सचिव आयुक्त संजय कापडणीस, महिला सदस्य सुभद्राबाई सुरेश नाईक, ज्योती बाळासाहेब चव्हाण, अनु.जमाती सदस्य पार्वताबाई भिल, अनु.जाती सदस्य अश्विन शांताराम सोनवणे, सुरेश माणीक सोनवणे, सदाशीव गणपत ढेकळे यांची निवड झाली आहे. अशासकीय सदस्य नाहीया समितीत या विषयातील अभ्यासक, तज्ज्ञ व्यक्तीची सदस्य म्हणून निवड करणे आवश्यक असल्याचे जाणकारांनी सांगितले मात्र तसा एकही सदस्य न घेतला गेल्याने जैव विविधता क्षेत्राचा अभ्यास असलेल्या तज्ज्ञांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.