शहरं
Join us  
Trending Stories
1
१९ तारखेला अत्यंत स्फोटक माहिती उघड होणार, ज्यानं भाजपा नेत्यांची फजिती होईल; संजय राऊतांचा दावा
2
महायुतीत एकनाथ शिंदेंची कोंडी; मुंबईत भाजपानं शिंदेसेनेला केवळ ५२ जागांचा दिला प्रस्ताव?
3
टीम इंडियाला मल्टीप्लेक्समध्ये पाहून सगळचे चकीत झाले...; मैदानातील सगळेच धुरंधर 'धुरंधर' पहायला गेलेले...
4
Crime: बुरखा न घातल्यानं पती संतापला, पत्नीसह पोटच्या २ मुलींना संपवलं; मृतदेह पुरले खड्ड्यात!
5
कोण आहे डोनाल्ड ट्रम्प यांची होणारी सून...! मंगळवारीच उरकला साखरपुडा, दोघे भारतातही येऊन गेलेले...
6
उद्धव-राज विरुद्ध भाजप-शिंदेसेना असाच सामना; १३८ मराठी बहुल मतदारसंघ या निवडणुकीत ठरणार निर्णायक
7
सरकार आणखी एका बँकेतील हिस्सा विकण्याच्या तयारीत; खात्यात येणार २१०० कोटी, सध्या आहे ९५% हिस्सा
8
'उद्याच्या तेजस्वी पहाटेसाठी!' रितेश देशमुखचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेतील पहिला लूक समोर
9
"महापालिका निवडणूक लुटण्याचे वाटे केले गेले"; अंजली दमानियांचा निशाणा, महायुतीवर भडकल्या
10
प्रसिद्ध दिग्दर्शक आणि पत्नीच्या हत्या प्रकरणाला नवं वळण, पोलिसांनी लेकालाच केली अटक
11
निवडणुका जाहीर होताच तापले युती अन् आघाडीचे राजकारण; महाराष्ट्रात काही ठिकाणी गणित बिघडणार
12
अमेरिकन शेअर बाजारात मोठा बदल! नॅस्डॅक २४ तास ट्रेडिंग सुरू करण्याच्या तयारीत; भारतीय गुंतवणूकदारांवर काय होणार परिणाम?
13
अमेरिकेत पॅलेस्टिनसह इतर ७ देशांतील नागरिकांना प्रवास बंदी; डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय
14
Stock Market Today: सुस्त सुरुवातीनंतर सेन्सेक्स-निफ्टीमध्ये किंचित वाढ; ICICI Bank, Nestle, HDFC Bank मध्ये घसरण
15
महालक्ष्मी व्रत उद्यापन: ४ गुरुवार नेटाने केलेल्या महालक्ष्मी व्रताचे १८ डिसेंबर रोजी उद्यापन कसे करावे? वाचा विधी
16
'१२ लाख सैनिकांची गरज काय? त्यांना दुसरे काम लावा'; पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्टच सांगितलं
17
आई मंदिराबाहेर फुले विकायची...! आयपीएलने मुलाला बनविले 'करोडपती', वडील मैदानावर...
18
LIC ची कोणत्या कंपनीत किती गुंतवणूक? सरकारनं दिली महत्त्वाची माहिती; टाटा, रिलायन्स, अदानीसह कोणत्या कंपन्या?
19
अंबरनाथमध्ये भाजपाचे उमेदवार पवन वाळेकर यांच्या कार्यालयावर गोळीबार; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
20
मुंबई-दिल्ली एक्स्प्रेसवेवर भीषण अपघात! धडक होताच उडाला भडका, तीन जणांचा आगीत झाला कोळसा
Daily Top 2Weekly Top 5

अभिमानास्पद! राजस्थानच्या डॉ. बिना मीना यांची नासामध्ये शास्त्रज्ञ म्हणून निवड

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2022 19:28 IST

Dr. Bina Meena : डॉ. बिना मीना या गुमानपुरा पंचायतीतील कोरडा कलां गावातील नारायण लाल मीना यांच्या कन्या आहेत. 

दौसा : राजस्थानच्या दौसा येथील डॉ. बिना मीना या नासामध्ये शास्त्रज्ञ बनल्या आहेत. सिकराई उपविभागातील कोरडा कलां गावची कन्या डॉ. बिना मीना यांची अमेरिकेतील स्पेस रिसर्च सेंटर नासामध्ये शास्त्रज्ञ म्हणून निवड झाली आहे. नासामध्ये डॉ. बिना मीना यांची निवड झाल्यानंतर त्यांच्या गावासह परिसरात आनंदाचे वातावरण आहे. डॉ. बिना मीना या गुमानपुरा पंचायतीतील कोरडा कलां गावातील नारायण लाल मीना यांच्या कन्या आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. बिना मीना यांनी 2018-22 मध्ये अमेरिकेतील जॉर्जिया स्टेट युनिव्हर्सिटी अटलांटा येथून भौतिकशास्त्र आणि खगोलशास्त्र विभागात पीएचडी पूर्ण केली. क्षेत्रीय संशोधनाच्या क्षेत्रात सक्रिय आकाशगंगांचे सुपरमॅसिव्ह ब्लॅक होल, बहिर्वाह आणि घूर्णन गतीशास्त्र यांचा समावेश होता. याव्यतिरिक्त, डॉ. बिना मीना यांनी हबल स्पेस टेलिस्कोपवर अपाचे पॉइंट ऑब्जर्व्हेटरी आणि स्पेस टेलिस्कोप इमेजिंग स्पेक्ट्रोग्राफमध्ये (STIS) ड्युअल इमेजिंग स्पेक्ट्रोग्राफ (DIS) वरून स्पेक्ट्रोस्कोपिक निरीक्षणांवर काम केले आहे.

डॉ. बिना मीना आता सप्टेंबरपासून नासामध्ये शास्त्रज्ञ म्हणून काम करणार आहेत. लहानपणापासून सुनीता विल्यम्स आणि कल्पना चावला यांच्यासारखे अंतराळात प्रवास करण्याचे स्वप्न पाहत होत्या, जे आता प्रत्यक्षात येणार आहे. दौसा जिल्ह्यातील कोरडा कलां (गुमानपुरा) या छोट्याशा गावातील एका सामान्य कुटुंबातील डॉ. बिना मीना यांचे वडील नारायण लाल मीना आता निवृत्त झाले आहेत. त्याची आई सुशिक्षित गृहिणी आहे. डॉ. बिना मीना यांनी दहावीचे शिक्षण जयपूरमधील एका खासगी शाळेत केले. त्यानंतर झालाना येथे बारावीचे शिक्षण पूर्ण केले. 

डॉ. बिना मीना यांनी अजमेरच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन्स इंजिनीअरिंगमध्ये बी.टेक केले. त्यानंतर 96 टक्के गुणांसह अभियांत्रिकी पदवीधर अभियोग्यता चाचणी (GATE) उत्तीर्ण झाली. यानंतर डॉ. बिना मीना यांनी आयआयटी दिल्लीमधून ऑप्टो-इलेक्ट्रॉनिक्स आणि ऑप्टिकल कम्युनिकेशनमध्ये एमटेक केले आणि अमेरिकेच्या जॉर्जिया स्टेट युनिव्हर्सिटीमधून भौतिकशास्त्रात मास्टर ऑफ सायन्स पूर्ण केले. तसेच. पीएचडीच्या काळात त्यांनी डेटमध्‍ये प्रथम पारितोषिकही पटकावले. अटलांटा सायन्स फेस्टिव्हलमध्ये सायन्स एटीएल कम्युनिकेशन फेलोशिप आणि जॉर्जिया स्टेट युनिव्हर्सिटीकडून प्रोव्होस्ट थीसिस फेलोशिप मिळाली. डॉ. बिना मीना यांचे अभ्यासादरम्यान द अॅस्ट्रोफिजिकल जर्नलसह अनेक प्रतिष्ठित जनरल्समध्ये लेखही प्रकाशित झाले आहेत.

टॅग्स :NASAनासाAmericaअमेरिकाRajasthanराजस्थान